• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी चौकात चारचाकी गाड्या अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. तसेच येथील बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणत वाढ झाली आहे. तरी येथील वाहतुकीला शिस्त लावून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, जिल्हा कार्याध्यक्ष विकास कांबळे, दिलीप टेकाळे, मुनीर शेख, अविनाश रानवडे, ओमकार शेरे, लक्ष्मण दवणे, सतिश नगरकर, युवराज भोंडवे, अशोक वाबळे, सुभाष कोठारी, जयवंत कुदळे आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिवाजीचौकात आणि फुटपाथवर वाहनचालकांकडून चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे तुकारामनगर, लक्ष्मीनगर, भालकी कॉलनी येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना येथून ये-जा करताना जिकिरीचे ठरत आहे. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी यांना येथून ये-जा करताना त्रास होत आहे. त्यासाठी येथे नो पार्किंगचे फलक लावण्यात यावेत. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळेस चारचाकी वाहने, बसेस लावल्या जातात. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच येथील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

Read 129 times Last modified on Sunday, 18 June 2017 09:37
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start