• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

निगडीतील निरुपम-2 सोसायटीतर्फे तुकोबांच्या पालखीवर पुष्पवृष्टी

एमपीसी न्यूज - आजी सोनियाचा दिनू बरसे आमृताचा घनु..या अभंगाप्रमाणे तुकोबारायांच्या पालखीवर निगडीतील निरुपम सोसायटीतर्फे काल (शनिवारी) सकाळी अमृताचा नाही पण फुलांचा वर्षाव करण्यात आला. नेत्रदिपक सोहळ्याने निरुपम सोसायटीच्या रहिवाश्यांनी पालखीचे स्वागत केले.

देहुगावच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर काल तुकोबारायांच्या पालखीचे निगडी येथे आगमन झाले. यावेळी उद्योग नगरीतील नागरिकांनी अगदी भक्ती भावाने पालखीचे स्वागत केले. यामध्ये निरुपम-2 सोसायटीचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगळेपण दिसले. पालखी मुक्कामस्थळाकडे मार्गस्थ होत असताना निरुपम सोसायटीतर्फे तुकोबारायांच्या पालखीवर पुष्पवृष्टी कऱण्यात आली.

यावेळी पालखीत सहभागी दिंडीतील वारकऱ्यांनी भजन आणि हरिपाठाचा कार्यक्रम सादर केला. सुमारे अडिचशे वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला. सोसायटीची व्यवस्थापन समिती आणि महिला सदस्यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी रवाना झाली.आज सकाळी पालखीचे पुण्यकडे प्रस्थान झाले आहे.

Read 70 times Last modified on Sunday, 18 June 2017 07:40
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start