• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : घोषवादनातून विद्यार्थीनींनी केले स्वामी विवेकानंदांना अभिवादन


अभिनेते राहुल सोलापूरकर यांची उपस्थिती ; ग्राहक पेठेतर्फे स.प.महाविद्यालय चौकात आयोजन

एमपीसी न्यूज - भारताबाहेर हिंदू धर्म व संस्कृती फारशी माहित नसताना स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील परिषदेत हिंदू धर्माविषयीचे महत्त्व कथन केले. आपल्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये देव शोधण्यापेक्षा गरजू व गरीबांमधील देव जाणून घेत त्यांची सेवा केल्यास आपल्या हातून चांगले काम होईल, अशी स्वामीजींची धारणा होती. त्यामुळे विचारांनी भारतभूमीचे महत्त्व जगभर पोहोचविणारे स्वामी विवेकानंद हे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते, असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स.प.महाविद्यालय चौकात अहिल्यादेवी प्रशाला, डी.ई.एस. प्रशाला आणि रेणुका स्वरुप प्रशालेतील विद्यार्थीनींनी घोषवादन करुन स्वामीजींना अभिवादन केले. यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अनंत दळवी आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

राजेंद्र भामरे म्हणाले, स्वामी विवेकानंदांच्या चरित्र वाचनातून आपली लहानपणापासून जडणघडण होत आहे. राष्ट्रवादाची संकल्पना स्वामीजींनी पहिल्यांदा राबविली. वेद आणि योग याचे महत्त्व जगासमोर ठेवले. त्यामुळेच आज या दोन्ही गोष्टींची ताकद जगाला समजू शकली आहे, असेही त्यांनी सांगितले. सारे जहॉंसे अच्छा... सारख्या घोषवाद्यांवरील देशभक्तीपर गीतांच्या वादनाने आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत पाठक यांनी प्रास्ताविक केले. 
Read 81 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares