• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : हुक्का पार्लर बंदीसाठी प्रशासनाप्रमाणे तरुणाईची साथ हवी


आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र : हुक्कापार्लर हे एक वाईट व्यसन याविषयावर चर्चासत्र 

एमपीसी न्यूज - सध्या झपाट्याने बदलणा-या जीवनशैलीमुळे व्यसनाधिनतेकडे वळणा-या तरुणाईची संख्या वाढत आहे. त्यामध्ये एक व्यसन म्हणजे हुक्का ओढणे. हुक्का पार्लरमध्ये जाणे ही सध्या प्रतिष्ठेची बाब मानली जात असून तरुणाईमध्ये याची के्रझ जास्त वाढत आहे. त्याचबरोबर हुक्क्याचे व्यसन केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो, ताण-तणाव कमी होतो, असा गैरसमज वाढत असतानाच हुक्का पार्लर बंदीसाठी प्रशासन व सामाजिक संस्था कार्यरत आहेत. परंतु त्याबरोबर तरुणांची देखील साथ मिळाली तर या व्यसनाला नक्कीच आळा बसेल, असा सूर हुक्कापार्लर हे एक वाईट व्यसन या विषयावरील चर्चासत्रात उमटला.

राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंती दिनानिमित्त आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे  मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स येथे हुक्कापार्लर बंदी या विषायवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोद बोरकर, प्रा. अविनाश ताकवले, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, राजन चांदेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.डी लॉरेन्स, प्रा. सारंग एडके, प्रा. सुशील गंगणे आदी उपस्थित होते.

सिध्दार्थ धेंडे म्हणाले, विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहर ओळखले जाते. पुणे शहराची ओळख सांस्कृतिक ठेवा असलेले, सायकलींचे शहर ही कालबाह्य होत असून आता आयटी हब अशी होऊ लागली आहे. पुणे शहरात वाढणाºया आयटी पार्कमुळे नाईट लाईफची संस्कृती देखील जोमाने वाढत आहे. पुण्यात फक्त हुक्का पार्लरला बंदी होऊन चालणार नाही, तर पुढील कारवाई देखील महत्वाची आहे. या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. तर पुणे शहर हे फक्त बौध्दिकदृष्टीने नाही तर वैचारिकदृष्टीने देखील स्मार्ट शहर होईल, असेही त्यांनी सांगितले.

अरुण आव्हाड म्हणाले, हुक्क्याची एक ठिणगी किती जीवघेणी ठरू शकते हे नुकत्याच कमलामिल येथे घडलेल्या दुर्घटनेत समजते. कोणत्याही राष्ट्राची हानी ही त्या देशातील तरुणांच्या व्यसनाधीनतेमुळे होते. आपले जीवन आणि राष्ट्र आपल्याला प्रगत करायचे असेल तर व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. आपल्या राष्ट्राची हानी टाळायची असेल तर व्यसनांच्या विळख्यात अडकू नका, असे त्यांनी सांगितले. डॉ.अमोद बोरकर, प्रा.अविनाश ताकवले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.अजय दुधाणे यांनी प्रास्ताविक केले. राजन चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. 
Read 85 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares