• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pimpri : महापालिकेतर्फे स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 
 
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर बागडे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले, आकाश चव्हाण, भरत गायकवाड, जोपा पवार, सुखदेव जाधव, रामदास कटके आदी उपस्थित होते.
Read 80 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares