• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pimpri : सोनल बुंदेले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

एमपीसी न्यूज - भारतीय खेल मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'खेलो इंडिया स्कूल गेम्स 2018' या स्पर्धेकरिता पिंपरी-चिंचवडच्या सोनल बुंदेले यांची पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र भारतीय तिरंदाजी संघाचे सहसचिव गुंजन अब्रोल यांनी दिले. 

या स्पर्धा नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 6 ते 8 फेब्रुवारी, 2018 दरम्यान होणार आहेत. 

सोनल बुंदेले या धनुर्विद्येच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच असून, त्यांनी भारतीय तिरंदाजी संघाच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. चिंचवड येथील स्टार आर्चर्स अकॅडमीच्या संचालिका प्रशिक्षक आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय व 50 हून अधिक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. तसेच त्या ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल चिंचवड येथे धनुर्विद्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुंदेले यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, पिंपरी-चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अमृता बोश यांनी अभिनंदन केले.

Read 147 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares