• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : महापालिका देणार कॅन्सर पीडितांना १ लाखाची मदत

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका परिसरात कॅन्सरने ग्रासलेल्या नागरिकांसाठी शहरी गरीब सहाय्यता योजनेअंतर्गत १ लाखाची मदत करण्याच्या प्रस्तावाला महिला आणि बालकल्याण विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. 

पुणे महापालिकेतर्फे शहरातील नागरिकांना वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत औषध उपचारासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. मात्र, कॉन्सर या गंभीर योजनेसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च येतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत १ लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम थेट संबंधित हॉस्पिटलला अदा करण्यात यावी, असा प्रस्ताव महिला बालकल्याण समितीकडे मंजुरीला आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

Read 67 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares