• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pimpri : बालाजी प्रतिष्ठाणची रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल


नगरसेवक हर्षल ढोरे यांनी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे वडील कै. पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव तसेच शहराच्या इतर भागातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी स्वखर्चातून आणलेल्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 11) लोकार्पण करण्यात आले.

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नामदेव ढाके, भाजपचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड हे शहर झपाट्याने विकसित होत असताना नागरिकांच्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे सातत्याने पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वास्थ्याची काळजी असल्याचे कृतीतून दाखवून देत आहेत. हर्षल ढोरे यांनीही रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे पक्षाचे नगरसेवकही आरोग्य विषयक प्रश्नांना प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघातांवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, “शहरातील कोणत्याही भागात झालेला अपघात असो की अचानक आलेला ह्दयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका या प्रत्येक घटनेत तातडीने प्रभावी वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक असते. अशा रुग्णांपर्यंत तातडीने पोहचून त्यांना जलदगतीने रुग्णालयापर्यंत पोचविण्याचे काम रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जलदगतीने करता येईल. आपत्कालिन स्थितीत रुग्णाला अगदी कमी वेळेत योग्य वैद्यकीय मदत मिळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहे."

नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले कि, “सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव व शहराच्या कोणत्याही भागातील अत्यावश्यक रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्याच्या माध्यमातून रुग्णांच्या आपत्कालिन वैद्यकीय सेवेला तत्काळ प्रतिसाद दिला जाईल.”
Read 83 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares