• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : मनापासून कार्य केल्यास आंतरिक आनंद मिळेल-प. पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे कीर्तन महोत्सव 

एमपीसी न्यूज- चांगले काम करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा आधी संकल्प करणे आवश्यक आहे. फळाची अपेक्षा न ठेवता संकल्प करून केलेल्या कार्याचे परमेश्वर नक्कीच चांगले फळ देतो. परंतु आपण करीत असलेले कार्य मनापासून करण्याची गरज आहे. मनापासून केलेल्या कार्याचाच आपल्याला आंतरिक आनंद मिळेल. आंतरिक सुखाची प्राप्ती झाली की बाह्य आनंदाची गरज भासणार नाही, असे मत प. पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सव 2017 चे आयोजन शनिवारवाड्यावर करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कर्नल संभाजी पाटील, शाहीर हेमंतराजे मावळे, आनंद सराफ, संदीप लचके, अ‍ॅड. सुभाष मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.

विद्या नृसिंह भारती म्हणाले, "आपली धर्मसंस्था ही एक बळकट संस्था असून धर्मसंस्थेकडे बोट दाखविता येत नाही. आपण जर धर्मसंस्थेकडे बोट दाखविले तर खरा धर्म आपल्याला समजलाच नाही. आपल्या आचरणातूनच धर्माची निर्मिती झाली" असेही त्यांनी सांगितले.

कर्नल संभाजी पाटील म्हणाले, "आपल्या देशात अजूनही अनेक लोक आहेत ज्यांना एकवेळचे जेवण देखील मिळत नाही. भारताला जर महासत्ता व्हायचे असेल तर प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून कार्य करणे गरजेचे आहे. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो हे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे"

शिरीष मोहिते म्हणाले, "कोणतेही काम प्रामाणिकणाने करण्याची शिकवण आईने लहानपणापासून दिली. सध्या तंत्रज्ञानाच्या जगात आई हरवत चालली आहे त्यामुळे आजची पिढी बदलत आहे. आईची शिकवण खूप महत्त्वाची आहे. भविष्यात चांगले कार्य करण्याची प्रेरणा चांगल्या शिकवणीतूनच मिळते" युवा शाहीर होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभूळगावकर यांनी आभार मानले.

Read 86 times