• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुदेशन सप्ताह व प्रश्नसंचाचे वाटप

एमपीसी न्यूज - दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पुण्यातील 'सुपरमाईंड' संस्थेतर्फे मोफत समुपदेशन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 9 डिसेंबर पासून त्याची सुरवात होणार आहे. दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिकांचा संच विद्यार्थ्यांसाठी www.supermindstudy.com या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे.

गरजू विद्यार्थ्यांना वर नमूद केलेल्या संकेतस्थळावरून प्रश्नसंच विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. यामध्ये इंग्रजी, सेमी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये असणार आहे. मोफत दिल्या जाणाऱ्या या संचामध्ये नवीन आराखड्यानुसार कृतिपत्रिकांचाही समावेश आहे. उत्तरपत्रिका लेखनतंत्र, परीक्षेतील वेळेचे नियोजन, विषयावार अडचणी, छोट्या-छोट्या चुका टाळणे, ताणाचे व्यवस्थापन, पालकांची भूमिका अशा विविध बाबींवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणारआहे.

Read 100 times