• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : रेडिओ हे सरकारपर्यंत शहराचा आवाज पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम

रेडिओ तज्ज्ञ व माध्यम प्रतिनिधींचे मत

एमपीसी न्यूज - गाणी, गप्पा, मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे काम रेडिओच्या माध्यमातून मोठया प्रमाणात होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात रेडिओ ऐकण्या-या तरुणाईचे प्रमाण वाढले असले, तरीही मनोरंजनासोबत श्रोत्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न रेडिओ करीत आहे. वाहतुकीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासोबतच पाणी, खड्डे, कचरा यांसारख्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही रेडिओ करीत आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी यांसोबतच आजच्या एकविसाव्या शतकात शहराचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग होत आहे, असा सूर रेडिओचे योगदान याविषयावरील चर्चासत्रामध्ये उमटला.

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे 'रेडिओचे पुण्यातील सामाजिक प्रश्नांवर योगदान' याविषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, रेडिओ जॉकी शोनाली, अपूर्वा, टिया, संग्राम यांसह प्रशांत सुरसे, उमेश काची, स्वाती मोरे, चित्रा माळवे, सलिम शेख आदी उपस्थित होते.

चित्रपटांतील कलाकारांप्रमाणे रेडिओच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी देखील विविध प्रश्नांविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. श्रोत्यांना बोलते करण्याचा प्रयत्न होत असून तणावाखाली असणारे अनेक श्रोते देखील रेडिओच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये व्यक्त होतात. रेडिओ हे श्रोत्यांचे व्यक्त होण्याचे साधन असून याद्वारे श्रोते देखील उर्त्स्फूतपणे आपले मते मांडतात. केवळ शहरातील प्रश्न सोडविण्यापुरते रेडिओचे योगदान नसून तर त्यावर होणारी सकारात्मकतेची देवाणघेवाण महत्त्वाची आहे. कचरा, हेल्मेटसारख्या अनेक प्रश्नांच्याबाबत रेडिओचे प्रतिनिधी देखील अभियानात सहभागी झाल्याने श्रोत्यांनी मोठया संख्येने प्रतिसाद दिला असल्याचे अनुभव यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

मोहन जोशी म्हणाले, " गेल्या 30 ते 40 वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये मोठया प्रमाणात परिवर्तन झाले आहे. पूर्वी प्रसारमाध्यमे तंत्रज्ञानाने परिपूर्ण नव्हती. तेव्हा केवळ रेडिओच्या माध्यमातून बातम्यांपासून इतर गोष्टी लोक ऐकायचे. आता देखील रेडिओचा उपयोग लोकांच्या भावनांना हात घालून सामाजिक प्रश्न सोडविण्याकरीता पुढाकार घेण्यामध्ये होत आहे, असेही त्यांनी सांगितले. पूजा डोळस यांनी निवेदन केले.

Read 107 times