• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : नितीन आगे खुनाच्या विरोधात 25 जानेवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा

एमपीसी न्यूज- अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच आॅनर किलिंग व जातीय धार्मिक हिंसाचाराच्या घटनांतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी 25 जानेवारी रोजी विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते डाॅ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. गेल आॅम्वेट विशेष उपस्थित होत्या.

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अश्विन दोडके, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, मास मुव्हमेंटचे विजयभाई जगताप , रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे , मातंग समाजाचे नेते अशोक लोखंडे , शंकरभाऊ तडाखे , प्रकाश वैराळ, लोकजनशक्तीच्या आरती साठे, काॅ. भीमराव बनसोड, केशव वाघमारे, अंकुश शेडगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत भारतीय गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी मंत्रालयावर लक्षावधी लोकांचा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत नियोजनासाठी राज्यव्यापी बैठक रविवारी (दि.17) मुंबई येथे घेण्यात येणार आहे. नितीन आगे हत्याकांड खटल्यात अॅट्राॅसिटी अॅक्टमधील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना न करणे तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यानी घेऊन राजीनामा द्यावा. तसेच या खटल्याची फेरतपासणी व सुनावणी व्हावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.

Read 116 times Last modified on Wednesday, 06 December 2017 14:07