• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : वत्कृत्व हे विद्यार्थ्यांमधील विचार मांडण्याचे उत्तम माध्यम- माजी उपमहापौर प्रसन्न जगताप

राज्यस्तरीय वत्कृत्व आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज- चालू घडामोडींसह समाजामध्ये आजूबाजूला दिसणा-या परिस्थितीविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. अनेकदा विद्यार्थी त्या प्रश्नांचा शोध घेतात आणि आपले स्वत:चे मतही तयार करतात. मात्र, आपले मत किंवा विचार मांडण्याकरिता त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. नव्या पिढीच्या अशा विचारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता निबंध आणि वत्कृत्व ही दोन उत्तम माध्यमे आहेत. भाषा कोणतीही असो, परंतु विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विचारांचा निष्कर्ष काढून कृती केल्यास समाजात नवनवीन बदल नक्कीच घडू शकतील, असे मत माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी व्यक्त केले.

न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल ट्रस्ट आणि पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड कॉलेजच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वत्कृत्व व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सायली वांजळे, नीता दांगट, राजश्री नवले, ललिता कुटे, जयश्री भूमकर, ज्योती गोसावी, दिलीप नवले, आनंद दांगट पाटील, पूनम पांगारे, लहुनाना शेलार, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. राज्यभरातील तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत आणि ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी वत्कृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता.

प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, " समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करताना वत्कृत्वगुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेतच प्रत्येकाचे विचार प्रगल्भ व्हावेत, याकरिता निबंध स्पर्धा आणि वत्कृत्व ही उत्तम माध्यमे आहेत. वत्कृत्वगुणामुळे कुशलता येते. तसेच यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची शक्तीही मिळते. सामाजिक, राष्ट्रीय, वैज्ञानिक अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मते वेळोवेळी प्रदर्शित करायला हवीत. त्यातून त्यांचे वाचन व विचार करण्याची ताकद वाढणार आहे"

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, "देशापुढील महत्त्वाची आव्हाने असलेल्या दहशतवाद, दुष्काळासारख्या प्रश्नांवर परखडपणे वत्कृत्व स्पर्धेतून आपली मते व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी त्यावर उपाययोजना देखील सुचविल्या. स्वामी विवेकानंदांपासून ते ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महापुरुषांपर्यंत प्रत्येकाचे कार्य आपल्या वत्कृत्वातून सांगितले. त्यामुळे अशा प्रकारचे व्यासपीठ वेळोवेळी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यायला हवे"

Read 82 times