• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : मिसेस डान्सिंग स्टार 2017'या आगळ्या वेगळ्या नृत्य स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज - 'निल डान्स फुटस अकादमी'आणि 'पुणे फिल्म कास्टिंग हाऊसच्या'वतीने 'मिसेस डान्सिंग स्टार 2017'या आगळ्या वेगळ्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे या स्पर्धेच्या महागुरू असणार असून या स्पर्धेच्या विजेत्यांना मानचिन्ह आणि रोख रकमेच्या स्वरुपात देखील पारितोषिक मिळणार आहे.

प्रत्येक महिलांमध्ये एक छुपा कलाकार लपलेला असतो .परंतु कधी परिस्थितीमुळे ,तर कधी संसाराच्या रहाटगाडग्यात आपल्यातील हा छुपा कलाकार मागे पडतो. त्यामुळे या सारख्या महिलांसाठी 'मिसेस डान्सिंग स्टार 2017'या आगळ्या वेगळ्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक महिलांनी आपला नृत्याचा व्हिडिओ बनवून तो 15 डिसेंबर पर्यंत 8623043462 या व्हॅट्सप क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे. स्पर्धेबद्दलच्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 'मिसेस डान्सिंग स्टार 2017'च्या अधिकृत फेसबुक पेजला भेट येऊ शकता.

Read 81 times