• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pune : राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज - डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटीडब्ल्यूपीयू) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (Under Graduate) संगीतभारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 रोजी एमआयटी कोथरूडच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. यासह एन्थुजिया महोत्सव 22 व 23 डिसेंबर रोजी रंगणार आहे, अशी माहिती संगीतभारतीच्या संयोजिका कल्याणी बेलसरे, एन्थुजियाच्या संयोजिका प्रा. पल्लवी आद्य, प्रा. शलाका घोडके यांनी दिली.

प्रा. कल्याणी बेलसरे म्हणाल्या, "11 वी ते पदवीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. शास्त्रीय गायनासाठी 7 मिनिटे, तर उपशास्त्रीय गायनासाठी 5 मिनिटांचा वेळ असणार आहे. स्पर्धेचे परीक्षण शास्त्रीय गायन क्षेत्रातील मान्यवर मंडळी करणार आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, ठुमरी, नाट्यसंगीत आदी कलाप्रकार सादर करता येतील.

भारतीय शास्त्रीय संगीत मुलांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्यातील गायक, नर्तक शोधावेत, हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. यामध्ये जवळपास 40-50 स्पर्धक सहभागी होतील. सावनी दातार या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. प्रथम व द्वितीय क्रमांकास रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. आरती अंकलीकर-टिकेकर, आदिनाथ मंगेशकर यांच्यासारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन या स्पर्धेच्या आयोजनात मिळत आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस प्रोत्साहित करत आहेत. अधिक माहितीसाठी 9921059461 यावर संपर्क साधावा."

प्रा. पल्लवी आद्य म्हणाल्या, "एन्थुजियाचे हे सातवे वर्ष आहे. ऑगस्टमध्ये 11, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर डिसेंबरमध्ये 11 वी ते सिनिअर कॉलेजच्या मुलांसाठी अशा दोन टप्प्यात हा महोत्सव रंगतो. जवळपास 1700 विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, क्रीडा कौशल्य सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. भारतीय संस्कृतीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत आणि त्यांना आपल्यातील कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा या महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश आहे. महोत्सवात विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. उत्कृष्ट कामगिरी करणा-या स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असून 'स्पोर्ट फिएस्टा'मध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल या स्पर्धा होणार आहेत.

Read 73 times