• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Pimpri: राष्ट्रीय योगपंच परीक्षेत टाटा मोटर्सची प्राजक्ता पांगारे भारतात प्रथम

एमपीसी न्यूज - योगा फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय योग संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय योगपंच परीक्षेत थिनेस क्रुप कंपनीचे मनोज पाटील तर राष्ट्रीय योगपंच परीक्षेत टाटा मोटर्सची प्राजक्ता पांगारे भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

कर्नाटक स्टेट अमॅच्युर योगा असोसिएशनतर्फे व योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली 19 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत कर्नाटक येथील शांतीवन धर्मस्थळ येथे द्वितीय फेडरेशन कप व आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अशोककुमार अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगपंच स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 120 परीक्षार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून 34 परीक्षार्थी सहभागी झाले होते. त्यातील 32 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये टाटा मोटर्सची प्राजक्ता पांगारे 100 पैकी 92 गुण मिळवून भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर, मनोज पाटील हे आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रातील तिसरे आंतरराष्ट्रीय योग पंच आहेत.

यशस्वी योग पंचांचे महाराष्ट्र योगा असोसिएशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, भारतीय योग संघाचे प्रशिक्षक व कर्णधार चंद्रकांत पांगारे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी योग पंचाचे शिबिर जानेवारी 2018 मध्ये कोकमठान, तालुका कोपरगाव जिल्हा अहमदरनगर येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य संघटनेचे सहसचिव जतीन सोळंकी यांनी दिली.

Read 94 times