• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
11 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरासह संपुर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवतीच्या दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर सव्वादोन महिन्यांनी पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना आज (रविवारी) ताब्यात घेतले आहे. 

असिफ शेख  व सलिम शेख उर्फ सँन्डी  (दोघेही रा. लोणावळा)  अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते.

 

लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस पॉईंट डोंगरावर 2 एप्रिल रोजी रात्री सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा नगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे व पुणे जिल्हातील जुन्नरची श्रुती डुंबरे या विद्यार्थी व विद्यार्थींनीचा दगडाने व अज्ञात हत्याराने डोक्यात व शरीरावर वार करुन खून करण्यात आला होता. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली होती.

08 Jun 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील तमाम कोळी, आग्री समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामींनी श्री एकविरा देवीच्या कार्ला गडावर देवीच्या जागरणांचा कार्यक्रम मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. नुकताच पद्म पुरस्कार मिळालेल्या गायिका अनुराधा पौडवाल, त्यांची कन्या कविता पौडवाल व कोळी आग्री समाजाचे ख्यातनाम गायक व शाहीर यांच्या मांदीआळीत मंगळवारी रात्रभर गडावर देवीचा जागर करण्यात आला. देवीच्या या जागरणाकरिता राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने आले होते.


एकविरा देवीच्या सर्व भक्तांना आयुष्यात सुख समाधान लाभावे, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, राज्य सुजलाम सुफलाम व्हावे, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळून बळीराजाला चांगले दिवस यावेत याकरिता दरवर्षी कार्ला गडावर देवीचा जागर श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केला जातो. मंगळवारी रात्री दहा वाजता देवीची विधिवत पुजा करत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे यांनी सपत्निक देवीच्या जागरणाचा दिवा प्रज्वलित केला. यावेळी देवीचा मुखवटा व प्रतिमेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवीला फळांच्या नैवद्यांची आरास करण्यात आली होती. अकरा वाजता गडावर दाखल झालेल्या गायिका अनुराधा पौडवाल यांनी देवीचे दर्शन घेत महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सुखी ठेव असे साकडे देवीकडे मागत जागरणाला सुरुवात केली.ओम भुर्र भुवर्त्सवा या गिताने जागरणाची सुरुवात करण्यात आली, पुढे सत्यम शिवम सुंदरम, शेरावाली माँ, शिव ही सत्य है, चांदणं चांदणं झाली रात, या कोलीवाड्याची शान, को ही कोंबडा कापता है, खुशी से रखदो नाम, यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, आई बसली कोंबड्यावरी, आई माऊलीचा उदं उदं, उदं बोला उदं माझ्या आई माऊलीचा उदं अशी एकापेक्षा एक कोळी आग्री समाजातील देवीची सुप्रसिध्द गाणी गाण्यांचे मूळ गायक हर्षला पाटील, शाहीर अर्जुन पाटील अटाळीकर, संजय गिरी, दत्ता भोईर, नरेश आरेकर, भारती मढवी, शाहिर किसन फुलोरे, अनुपमा वैदय, अक्षय पाटील, जगदिश पाटील, सुजित पाटील, समाधान फोफेरकर, प्रविण कुवर, सोनाली भोईर, रोशनी भगत, संतोष कदम, रोहित पाटील यांनी सादर केली. जागरणांला उपस्थित भाविकांनी या गाण्यांवर ठेका धरत कार्यक्रमांची रंगत वाढवली. पहाटेच्या समयीला देवीचे कथा कथन करण्यात आले. बुधवारी पहाटे देवीचा अभिषेक, विधिवत पुजा व मान हे कार्यक्रम पार पडले.

 

श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, उपाध्यक्ष मदन भोई, सचिव व मुख्य पुजारी संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त सल्लागार काळूराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, किरण येवले, व्यवस्थापक भानुदास म्हात्रे, विश्वनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. कार्यक्रमा दरम्यान मुंबईतील देवीच्या एका भक्ताने देवीच्या चरणी सोन्याची गदा अर्पण केली.

07 Jun 2017

एमपीसी न्यूज - राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातील माजी सैनिक बळवंतराव लवाटे यांना नुकताच अहिल्यादेवी रत्न समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार अमर साबळे यांच्या हस्ते लवाटे यांच्या सोबत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रामभाऊ थोरात, सहाय्यक आयुक्त मांडूरके, उद्योजक अशोक खटके यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंदळकर, नानासाहेब सूर्यवंशी, अनिता लवाटे, सिने अभिनेत्री रोहिणी माने, स्वाती वेताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पाडूंळे, संपत पाडूंळे, भरत महानवर हे उपस्थित होते.

माजी सैनिक असलेले लवाटे यांचे आध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य असून त्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी, स्वा. सावरकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे, डोंगरदर्‍यांमध्ये राहणारे भटके व विमुक्त यांना मोफत वैद्यकिय सेवा पुरविणे, विविध धार्मिक कार्यक्रमातून एकोपा साधणे असे कार्य करत आहेत. याची दखल घेऊन त्यांना अहिल्यादेवी रत्न समाजभूषण देण्यात आला.

07 Jun 2017

रस्ते विकास महामंडळाने मागविल्या सूचना व हरकती


एमपीसी न्यूज - पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्या आहेत. याकरिता महामंडळाने थेट जनतेमधून सूचना व हरकती मागविल्या असून येत्या 24 जुलैपर्यंत त्याकरिता कालावधी दिला आहे. हा पूल मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने पाडण्याचा विचार सुरू आहे.पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अॅनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली 1830 साली बोरघाटात उभारण्यात आला होता. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पूल मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी अडथळा ठरु लागला आहे. त्यामुळे हा पूल पाडून या ठिकाणची वळणे काढून रस्ता सरळ झाल्यास या परिसरात होणारी वाहतूक कोंडी व अपघात दोन्ही कमी होतील असे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सदरचा पूल हा रेल्वेच्या ताब्यात असल्याने याबाबत रेल्वे प्रशासनाशी देखील पत्रव्यावहार करण्यात आला असून नागरिकांच्या याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई - पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारे अंतर कमी व्हावे व ही शहरे जलदगतीने जोडली जावीत याकरिता द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र खंडाळा बोरघाटातील खोपोली ते खंडाळा परिसरात द्रुतगती महामार्ग बनविताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या परिसरात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र आले. त्यातच घाट क्षेत्रातील चढण व उतारामुळे या परिसरात अपघात व वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. द्रुतगतीवर दुतर्फा असलेल्या मार्गीकांपैकी सर्वात शेवटची लाईन ही अवजड वाहनांसाठी मधली लेन ही हालक्या वाहनांसाठी व कॉरिडोरच्या लगतची लेन ही ओव्हर टेकिंगसाठी असा नियम आहे. मात्र,  असे असताना अमृतांजन पुलाखालील अरुंद जागेमुळे या ठिकाणी नियमांला छेद देत शेवटची लेन हालक्या वाहनांसाठी व मधली लेन अवजड वाहनांसाठी असे फलक लावलेले असल्याने याठिकाणी लेन कटिंगची समस्या मोठी आहे. अमृतांजन पुलाच्या खाली रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांना उतारावर वळण घेता येत असल्याने वाहने उलटून अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी सध्या रस्ते विकास महामंडळाने सदरचा पूल पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारे अपघात व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खालापूर ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज दरम्यान नवीन पर्यायी रस्ता बनविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असताना ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहेत.

 

अमृतांजन पूल

 

ब्रिटीश काळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती. त्या काळात ब्रिटीश अधिकार्‍यांनी सह्याद्रीची नाळ कोकणाशी जोडण्यासाठी 187 वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी केली. खंडाळा बोर घाटातील या पुलावर वेदनाशामक अमृतांजन बामच्या जाहिरातीचा फलक अनेक वर्षे होता. त्यामुळे या पुलाला अमृतांजन पूल हे नाव पडले व तीच पुढे त्यांची ओळख झाली. अमृतांजन पुलावरुन पूर्वी वाहतूक होत असे कालांतराने हा पूल जीर्ण झाल्याने त्याला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर उभे राहिले असता निसर्गरम्य खंडाळा घाटातील विहंगम दृष्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वे गाडी आदींचे दर्शन होते. पर्यटकांसाठी तो एक महत्वांचा पिकनिक स्पॉट बनला आहे.

07 Jun 2017

एमपीसी न्यूज - जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान लोखंडी पाईप घेऊन पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्यावरच उलटला. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक व पाईप हे रस्त्यावरच असल्याने पुण्याकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. 

 


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक (KA 39 - 9586) हा चालकाचा ताबा सुटल्याने एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान रस्त्यामध्येच उलटला. त्यामुळे त्यातील लोखंडी पाईप रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सध्या रस्त्यावर पडलेले पाईप आणि ट्रक बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.

06 Jun 2017


एमपीसी न्यूज - राज्याचे मान्सूनचे आगमन लांबणार असा अंदाज नुकताच हवामान शास्त्रज्ञांनी नोंदविलेले असताना आज लोणावळा व ग्रामीण परिसरात पावसाने सायंकाळच्या सत्रात जोरदार हजेरी लावत सर्व अंदाजावर बरसात केली.

आज सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. हवेत गरमी देखिल वाढलेली असल्याने दुपारनंतर पाऊस येईल अशी शक्यता निर्माण झालेली असताना साडेपाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावत परिसरात पाणीच पाणी केले.चाकरमण्यांच्या कामावरुन सुटण्याच्या वेळेला पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली.

मावळात अनेक ठिकाणी भातरोपे पेरण्याची तसेच मशागतीची कामे सुरु झालेली असल्याने बळीराजाने पावसाचे स्वागत केले. ग्रामीण भागात मात्र पावसामुळे विटभट्टयांसाठी हा पाऊस नुकसानीचा ठरणार आहे.

05 Jun 2017

एमपीसी न्यूज - शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहरात कडकडीत बंद पाळत पाठिंबा देण्यात आला. लोणावळा शहर काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपाला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा बंदचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला व्यापार्‍यांनी पाठिंबा देत बंदात सहभाग नोंदविला.

 


काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायण आंबेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजु बोराटी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आयचे प्रदेश सदस्य दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, नगरसेवक निखिल कविश्वर, सुधिर शिर्के, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुर्वणा अकोलकर, बाळासाहेब कडू, नारायण पाळेकर, बाळासाहेब लोखंडे, जीवन गायकवाड, डाॅ. चिंतामणी, अरुणा लोखंडे, सुनील मोगरे, फिरोज बागवान, शिवराज मावकर, वसंत भांगरे, सुबोध खंडेलवाल, रवींद्र कडू, प्रकाश गवळी, दिपाली गवळी, श्वेता वर्तक, संयोगिता साबळे, ज्ञानेश्वर येवले, संजय थोरवे, राजेश मेहता, दत्तात्रय गोसावी, सनी पाळेकर, गणेश चव्हाण यांनी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमत भाजपा सरकारचा निषेध नोंदवत शेतकर्‍यांना कर्ज माफी द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा अशी मागणी केली.

lo banda1

04 Jun 2017

एसआयटीला देखील मिळेना यश

 

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरासह संपुर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवतीच्या डबल मर्डर प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाही. त्यामुळे मृत युवक व युवतीच्या नातेवाईकांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.
मागील महिन्यात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमली होती. मात्र, एसआयटीच्या तपास पथकाला देखील प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलेले नाही.

 

लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस पॉईट डोंगरावर 2 एप्रिल रोजी रात्री सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा नगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे व पुणे जिल्हातील श्रुती डूंबरे या विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा अंगातील कपडे काढून दगडाने व अज्ञात हत्याराने डोक्यात व शरिरावर वार करुन खून करण्यात आला होता. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अपर अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजुन काढला. खूनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली.

 

हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा घेण्याचा कसोशिने प्रयत्न केला, याप्रकरणाला एक महिना उलटला तरी तपास यंत्रणांना अपयश आल्याने मृत सार्थकच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 20 मे रोजी आत्मदहन करण्याचा तर नातेवाईकांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा २ मे रोजी लोणावळा पोलीसांना निवेदनाद्वारे दिल्यानंतर तातडीने पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली तसेच आरोपींची माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवत 50 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. याला देखील महिना उलटला तरी तपासात प्रगती झाली नसल्याने दोन महिन्यानंतरही लोणावळ्यातील डबल मर्डर प्रकरणी पोलिसांचे हात रिक्तच राहिले आहेत.

03 Jun 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर औंढे गावाच्या हद्दीत भरधाव वेगातील झायलो मोटार गाडी उलटून आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर हा अपघात झाला.

अपघातात ओंकार महेश हिंदळेकर (वय 10), मनिषा महेश हिंदळेकर (वय 35), रेखा रत्नाकर हिंदळेकर  (वय 71) व सानिया देवेंद्र पराडकर (वय 12) यांचा मृत्यू झाला असून रत्नाकर राजाराम हिंदळेकर (वय 75), कृतिका गणेश हिंदळेकर (वय 12), प्रियांका उमेश हिंदळेकर (वय 30), कुणाल उमेश हिंदळेकर (वय 3), प्रशांत काशिनाथ गावकर (वय 50), प्रियांशी प्रशांत गावकर (वय 40), निलम देवेन पराडकर (वय 36), जतीन प्रशांत गावकर (वय 25), विभावरी देवेन पराडकर (वय 8), चालक गणेश रत्नाकर हिंदळेकर (वय 43 सर्व राहणार समतानगर साई आनंद भवन  पाचपाखडी ठाणे) हे जखमी झाले आहेत.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली झायलो ही प्रवासी मोटार क्र. (MH 04 GD 834) ही चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सुरक्षा बॅरिकेट्सला धडकून उलटल्याने हा अपघात झाला. सर्व जखमींना खंडाळा महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आर्यन देवदूत पथक व आयआरबीचे कर्मचारी यांनी गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले.

02 Jun 2017


एमपीसी न्यूज - मागील दोन दिवसांपासून मावळ परिसरात वाढलेल्या गरमीनंतर आज दुपारी लोणावळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गरमीने हैराण झालेल्या लहान मुलांनी आज पावसात भिजण्याचा आनंद घेतला.


चार पाच दिवसांपूर्वी लोणावळा परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. यानंतर आकाश निरभ्र झाल्याने गत दोन तीन दिवस कडक ऊनामुळे नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासून प्रचंड गरमी जाणवू लागल्याने पाऊस लवकरच येईल अशी शंका नागरिक उपस्थित करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यांच्या लगत पाण्याची डबकी तुंबली होती.

bhiku waghere advt

moreshwar bhondve adct

Page 10 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start