• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
24 Jun 2017

एमपीसी न्यूज - "संत सेवा हिच ईश्वर सेवा" असा ध्यास मनी बाळगत लोणावळ्यातील गगनगिरी सेक्युरिटी सर्व्हिसच्या वतीने पुणे मुक्कामी असलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमधील हभप वास्कर महाराज दिंडी क्र. ‍१ च्या अडीच हजार वारकर्‍यांना अन्नदान व चिक्की वाटप करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून गगनगिरी सेक्युरिटीचे संस्थापक माजी सैनिक बळवंतराव लवाटे हे अन्नदान करत आहे. 

याविषयी बोलताना लवाटे म्हणाले, राज्याच्या कानाकोपर्‍यांतून हजारो लाखो भाविक दरवर्षी नित्यनेमाने आषाढी एकादशी करिता पंढरपुरला जातात. अतिशय शिस्तबध्दपणे संताचा हा मेळा तहानभुक हारपुन लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी दिंड्यांच्या माध्यमातून मार्गक्रमण करत असतो, या संतांमध्ये - भक्तांमध्ये आम्ही देव पाहतो व त्यांना यथाशक्ती अन्नदान करतो. यानिमित्त संतांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. मागील अनेक वर्षापासूनच्या या संतसेवेत यावर्षी पुण्यातील डॉ. अहिरराव, गौरव लवाटे, किरण लवाटे, अनिता लवाटे, अर्चना गोसावी, सुनील नलावडे, विनोद नलावडे, आकाश शेंडगे, सुर्वणा शेंडगे हे सहभागी झाले होते.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने लोणवळा व खंडाळा परिसरात 400 झाडांची लागवड करण्यात आली आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खंडाळा पोलीस चौकी शेजारील मोकळ्या जागेत वृक्षारोपन करण्यात आले.


या अभियानात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे यांच्यासह लोणावळा शहर व खंडाळा चौकीचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना ज्ञानेश्वर शिवथरे म्हणाले पर्यावरणचा समतोल राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या सर्वत्र वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तर दुसरीकडे जमिनीची धूप होऊन ऊष्णता वाढू लागली आहे. यामुळे निसर्गचक्राचा समतोल बिघडला आहे. निर्सगाचा हा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाच्या मोहीम सहभागी व्हावे. लोणावळा परिसरात एक हजारांहून अधिक झाडे लावण्याचा माझा मानस असून त्याची सुरुवात आज पोलीस स्थानकांपासून वृक्षारोपण करून केली आहे. विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून ग्रामीण परिसरात देखील वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सभागृहातील विरोधी पक्षाला कार्यालय देण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक नितिन आगरवाल, राजू बच्चे, पूजा गायकवाड, निखिल कविश्वर, देविदास कडू, दिलीप दामोदरे, माणिक मराठे, आरोही तळेगावकर, अपर्णा बुटाला, रचना सिनकर, मंदा सोनवणे, सेजल परमार, जयश्री आहेर, प्रमोद गायकवाड, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

विरोधी पक्षाच्या गटनेत्या शादान चौधरी यांचा यावेळी नगराध्यक्षा जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विरोध पक्षाचे गटनेते असले तरी सहयोगी नगरसेवक म्हणून विकासकामात सहकार्य करा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - जागतिक योग दिन लोणावळा परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कैवल्यधाम संस्था, महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, आयएनएस शिवाजी, लोणावळा नगरपरिषदेच्या सर्व शाळा काही खासगी शाळा, पोलीस स्थानके आदी ठिकाणी प्रशिक्षित मार्गदर्शकाने नागरिकांना योगाचे धडे दिले. सुमित्रा हॉल भांगरवाडी येथे भाजपच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

योगा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाचे आपले शरीर व मन प्रसन्न तसेच निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यास करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक व सभागृहातील गटनेते भरत मारुती हारपुडे यांचे जात प्रमाणपत्र पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने हारपुडे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

डिसेंबर 2016 रोजी झालेली लोणावळा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक भरत हारपुडे यांनी कुणबी दाखल्यावर लढवली होती. मात्र हारपुडे यांच्या या दाखल्यावर वसंत काळोखे यांनी आक्षेप घेतला होता. सदर अर्जाच्या आधारे हारपुडे यांच्या जात पडताळणीच्या अर्जावर सुनावणी घेऊन कुणबी या जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या विषयी बोलताना हारपुडे यांनी समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सदर निर्णयाच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

20 Jun 2017


एमपीसी न्यूज -  लोण‍वळ्यातील भ‍ांगरवाडी व गावठाण या ठिकाणी आज भर दुपारी दोन घरफोड्या झाल्या.

पहिली घरफोडी भांगरवाडी येथिल तालिम ओटासमोर पाठारे बिल्डिंगमध्ये आजिनाथ काटे (वय 28) याच्या घरात झाली. दरवाजाला कडी असल्याचा डाव साधत सुटाबुटातील तिन चोरट्यांनी घरात घुसून कपाटात एका डब्यात ठेवलेली एक तोळ्याची सोन्याची चैन, दोन अंगठ्या, दोन गळ्यातील पानं, एक नथ, लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा साधारण 75 हजारांचा मुद्देमाल पळविला.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडते ना घडते तोच गावठाण लोणावळा येथे अडीच वाजता ज्योती अशोक हारपुडे (वय 45) यांच्या घरात चोरट्यांनी हात मारत 21 हजारांची रोकड, कानातील व गळ्यातील चैन मिळून एक तोळा सोनं असा 51 हजारांचा मुद्देमाल पळविला. याठिकाणी देखिल तिन जण होते असे सांगण्यात आले

20 Jun 2017

एमपीसी न्यूज - मुक्या जनावराला बोलता आले असते तर किती बरे झाल असते असे बरेच वेळा आपल्याला वाटत असते. कारण ब-याच वेळा त्यांची अडचण काय हे समजणेच कठीण जाते. असाच प्रसंग विसापुरच्या किल्ल्यावर घडला. एक गाय चरत-चरत डोंगर माथ्यावरुन खाली आली. मात्र ती अशी अडकली की तिला धड वरही जाता येत नव्हते की, खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे ती बीचारी दोन दिवस उपाशी रहायली. ही बाब उशीरा स्थानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर शिवदुर्ग टीमने तिला 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काल (सोमवारी) दुपारी वर काढले.

पावसाळ्यात डोंगर माथ्यावर गायी चरायला जातात. त्याप्रमाणे ही गाय देखील गेली. मात्र चरत असताना ती नकऴत दरीच्या बाजूने डोंगराचा काही भाग खाली उतरली. मात्र त्यापुढे तिला 600 फुट खोल दरी दिसल्याने ती तिथेच थबकली. मात्र ती अशा ठिकाणी अडकली होती जिथून तिला वर येणेही शक्य नव्हते. त्यात गाय तिथे आहे हे नागरिकांना दिसले होते. मात्र ती फिरत होती याचा अर्थ ती ठिक आहे म्हणून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र गेली दोन दिवस ती गाय तिथेच घूटमळत असल्याने लोहगड किल्ल्याचे सुरक्षारक्षक रोहीत निसाळ यांनी आधी स्वतः प्रयत्न केला. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी त्वरीत शिवदुर्गला संपर्क केला.

शिवदुर्गची टीम घटनास्थळी पोहचली. मात्र गाय तोपर्यंत अन्नपाण्याशिवाय अशक्त झाली होती. त्यात तिच्या दुस-या बाजुला खोल दरी होती. या परिस्थितीतही आव्हान स्विकारून वैष्णवी भांगारे, प्रवीण देशमुख, किसन बेरकर, सुनिल गायकवाड, अजय मयेकर, रोहीत नगीणे, मुन्ना शेख, डॉ. आशिष वनर यांच्या टीमने दोरखंडाच्या सहाय्याने गायीला डोंगर माथ्यावर आणले. यामध्ये गायीला जखम झाली नव्हती पण ती अशक्त झाली होती. तिचा चारा व पाणी दिल्यानंतर तिची प्रकृती आता स्थिर झाली आहे.

18 Jun 2017


टपरी चालकाचे ग्रामीण पोलीस व आयआरबीच्या विरोधात बंड

एमपीसी न्यूज - वरसोली टोलनाक्यालगत मागील अनेक वर्षापासून चहा, वडापाव विक्रीचा व्यावसाय करणार्‍या टपर्‍यांवर मागील आठवड्यात आरआरबी कंपनीने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. हे करत असताना सर्व टपर्‍या जागीच ठेवत तुळशीराम पिंगळे यांची टपरी मात्र जप्त करुन नेहण्यात आली आहे. ह्या टपरीत तीन हजार रुपये रोख व साहित्य मिळून 50 ते 60 हजारांचा माल असल्याने मला रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचे निवेदन पिंगळे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस व वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे.


माझी जप्त केलेली टपरी मला परत द्या, अन्यथा टपरी पथारी हातगाडी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे, लोणावळा अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण व वेळप्रसंगी कुचुंबियासमवेत सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा पिंगळे यांनी दिला आहे. उद्योजक विलास विकारी यांच्या सांगण्यावरुन माझी टपरी उचलून नेण्यात आली असल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे.

कायदा सुव्यवस्था बिघडविल्यास कडक कारवाई

तुळशीराम पिंगळे यांचे निवेदन प्राप्त होताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पिंगळेला सिआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावली असून वरील निवेदनाच्या आधारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास कडक कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. तसेच आपली टपरी ही आयआरबीने पोलीस संरक्षणात काढली आहे. त्यामध्ये आमचा संबंध नाही तुम्ही योग्य त्या कोर्टात न्याय मागा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

18 Jun 2017

एमपीसी न्यूज - समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्था यांचा रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने आज कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्यंकटराव भताणे, लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस व रोटरी क्लबचे अध्यक्ष बापु पाटील यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात आले. यावेळी मनशक्ती केंद्राचे संचालक प्रल्हाद वाफाळे, एकविरा प्रतिष्ठानचे संचालक निवृत्ती देशमुख, उत्तरा पर्यावरण शाळेचे प्रमुख निलमकुमार खैरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार नवनाथ देशमुख आदी मान्यवर व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना बापु पाटील म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजात काम करत असताना शिक्षण, समाजकार्य, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात काही मंडळी व्यक्तीगत रित्या तर काही संस्थाच्या माध्यमातून आत्मियतेने काम करत असल्याचे निदर्शनास आले. अशा मंडळींचा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा मानस मनाशी बाळगत रोटरी क्लबच्या वतीने यावर्षी प्रथमच नविन उपक्रम हाती घेत लोणावळा व ग्रामीण परिसरातील 35 जणांना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना व्यंकटराव भताणे म्हणाले, समाजात आपण निस्वार्थपणे व कोणतीही अपेक्षा न धरता काम करत असताना रोटरी सारख्या संस्था आपल्या कामाची दखल घेत आहे हे पुरस्कार्थीसाठी गौरवास्पद आहे. विनय विद्वांस यांनी सर्व पुरस्कार्थीचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कुलकर्णी यांनी केले तर रोटिरियन वानखेडे यांनी आभार मानले.

16 Jun 2017


एमपीसी न्यूज - साप्ताहिक अंबरचे सहसंपादक प्रशांत पुरुषोत्तम पुराणिक यांना पुण्यातील जयहिंद परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुराणिक हे मागील 18 वर्षापासून पुराणिक हे पत्रकारितेत कार्यरथ आहेत. पत्रकारितेसोबत ते लोणावळ्यातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतात. मायमर मेडिकल काँलेजच्या माध्यमातून त्यांनी अनेक मेडिकल कँम्प लोणावळा परिसरात घेतले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत सदरचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आल्याचे यावेळी जयहिंद परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

Page 8 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start