• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
22 Jul 2017

भुशी धरणाकडे जाणारा मार्ग बंद

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात मागील 24 तासापासून सुरू असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंटकडे जाणार्‍या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाकडे जाणारा मार्ग पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. लोणावळ्यातील टाटा कंपनीचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने तसेच इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीकाठच्या सर्व गावांना सर्तकतेचा इशारा मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांनी दिला आहे.

गत दहा दिवसांपासून लोणावळ्यात पावसाची संततधार सुरू असून काल रात्रीपासून पावसाची अतिवृष्टी सुरू झाल्याने सर्व ओढे नाले भरभरून वाहू लागल्याने लोणावळा बाजारपेठेतील मावळा चौक, गुरुद्वारा चौक, लोणावळा सहकारी बँक चौक, गवळीवाड्यातील बस स्थानकाचा परिसर यासह तुंगार्ली, नांगरगाव, भांगरवाडी, वलवण गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

ग्रामीण भागात इंद्रायणी नदीचे पाणी डोंगरगाव, सदापूर, वाकसई, कार्ला, मळवली, नाणे मावळ परिसरात पसरल्याने गावांना पुराचा विळखा बसला असून सांगिसे पूल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोणावळा धरणातून इंद्रायणीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना व घरांना सर्तकतेचा इशारा लोणावळा व मावळात देण्यात आला आहे.

dharan 1

lonavala 1


Advt

Ajit

21 Jul 2017

एमपीसी न्यूज- वातावरणाचा समतोल राखण्याची क्षमता ही झाडांमध्येच असल्यामुळे 'झाडे लावा झाडे' जगवा या मोहिमेचा एक भाग म्हणून लोणावळा व मावळ परिसरात 12 किलो झाडांच्या बियांची लागवड करण्य‍ात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.

शिवथरे म्हणाले, " बिबवा, रिटा, शमी, बाहवा, पृथरनजीवा या जातीचा झाडाच्या 12 किलो बिया एका सामाजिक संस्थेने दिल्या आहेत. त्या बिया रस्त्या लगतच्या मोकळ्या जागेत, डोंगरावर कोठेही ठाकल्या तरी ज्या जीव धरतात व त्याचे झाडात रुपांतर होते. या बियांचा ग्रोथ दर हा 85 टक्के आहे. सध्या मावळात सर्वत्र पावसाचा हंगाम असल्याने या बियांची लागवड केल्यास काही दिवसातच त्यांचे रुप‍ांतर झाडांमध्ये होईल. या पावसाळ्यात मी एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता मात्र प्रत्यक्षात दीड हजारांपेक्षा जास्त झाडांची लागवड झाली. याकरिता मला माझ्या विभागातील पोलीस ठाण्यांचे कर्मचारी, एकलव्य ग्राम सुरक्षा दल, काही शाळा व संस्था य‍ांची मदत ल‍ाभली"

प्रत्येकांने कर्तव्य समजुन वृक्ष लागवड केल्यास त्यांचे चांगले परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला पहायला मिळतील असा आशावाद शिवथरे यांनी व्यक्त केला. वरसोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या बियांचे वाटप करण्यात आले.

20 Jul 2017

एमपीसी न्यूज-  लोणावळा येथे  गिधाड तलावाजवळील धबधब्यामधील 14-15 फुट खळग्यामध्ये पोहायला उतरलेल्या अंधेरीच्या 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

धवल विजय परमार (वय 26 रा. अंधेरी)  असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत फिरण्यास आलेल्या धवलला पाण्यात उतरण्याचा मोह अनावर झाला. त्यामुळे तो पाण्यात उतरला मात्र त्याला खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमला फौजदार दरेकर यांनी संपर्क केला मात्र  ट्रॅफिक मुळे घटनास्थळी पोचायला उशीर झाला होता. तोपर्यंत तेथे व्यवसाय करणारे दिनेश कोकरे, दिनेश मरगळे, राजू हिरवे यांनी मृतदेह शोधून बाहेर काढला होता. त्यानंतर शिवदुर्ग सदस्यांनी तो मृतदेह उचलून वर रस्त्यावरील  शववाहिकेपर्यत आणून पोलिसांच्या स्वाधीन केला.

पर्यटकांनी  पाण्यात उतरण्यापूर्वी काळजी घ्यावी  असे आवाहन  पोलिसानी केले आहे.
20 Jul 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा परिसरात मागील आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिसरातील सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात 111 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात आज पर्यत 2620 मिमी (103.15 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर 1855 मिमी (73.03 इंच) पाऊस झाला होता. मागील सात दिवसात शहरात तब्बल 855 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 72 टक्के तर लोणावळा परिसरातील वलवण धरण 63 टक्के, तुंगार्ली धरण 70 टक्के भरले आहे. मावळातील लहान व मध्यम आकाराची धरणे असलेल्या भुशी, लोणावळा धरण, वाडीवळे ही धरणे पूर्ण भरली आहेत.  मात्र, संततधार पावसामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाची संततधार थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे व सूर्यनारायणाचे दर्शन होत नसल्यामुळे साथीचे आजार वाढू लागले आहेत.

17 Jul 2017


एमपीसी न्यूज - मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात सातत्याने वेहेरगाव रोड पाण्याखाली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, मावळचे अधिकारी याकडे दुलर्क्ष करत आहे. जर मार्ग दुरुस्त करता येत नसेल तर याठिकाणी जल वाहतुक सुरु करावी अशी उपरोधक मागणी करत समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी दहा वाजता या मार्गावर होडी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनविसेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी दिली.

कुटे म्हणाले वेहेरगावच्या डोंगरावर कुलस्वामीनी आई एकविरेचे मंदिर आहे. प्राचिन कार्ला लेणी असल्याने राज्यभरातून भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी येत असतात. वेहेरगाव व दहिवली ग्रामस्त, शाळकरी विद्यार्थी, कामगार यांना याच मार्गावरुन पाण्यातून जिव धोक्यात घालून दररोज मार्गक्रमण करावे लागते. वेहेरगाव रोडच्या दोन्ही बाजुला असणारे नाले साफसफाई अभावी काही ठिकाणी बंद झाले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे त्यांचे अंतर कमी झाले तर काही ठिकाणी नालेच गायब झाले आहेत.

वारंवार याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार व मागणी करुन देखिल ते रस्ता दुरुस्ती व नाले सफाईच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांना मागील काही वर्षापासून पावसाळ्यात या जलमय मार्गावरुन प्रवास करावा लागतो आहे. मागील तिन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने रस्त्यावरुन सर्वत्र पाणी वाहत आहे.

17 Jul 2017


एमपीसी न्यूज - नांगरगाव ते वलवण दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वारंवार लोणावळा नगरपरिषदेला विनंती करुन देखिल प्रशासन समस्येकडे दुलर्क्ष करत असल्याने नांगरगाव येथिल रहिवाश्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपण केले.

आंदोलनात मनसे विद्यार्थी संघटनेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे, लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रदीप थत्ते, सुनिल गायकवाड, विवेक भांगरे, गणेश भांगरे, प्रशांत जाधव, किशोर भांगरे, रमेश गुप्ता, राज यादव, संजयकुमार, सूरज कांबळे सहभागी झाले होते.

याविषयी बोलताना प्रदिप थत्ते म्हणाले, नांगरगाव ते वलवण दरम्यानच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. स्वामी समर्थ मठ ते विज वितरण कार्यालयाकडे जाताना अक्षरशः रस्ता कुठे आहे हे शोधावे लागते. आयटीआयकडे जाणारा रस्ता देखिल पुर्णतः खराब झाला आहे. हजारो विद्यार्थी रोज या मार्गावरुन चिखल तुडवत मार्गक्रमण करतात. वारंवार दुरुस्तीची मागणी करुन देखिल प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने अखेर या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन निषेध नोंदविण्यात आला. 

16 Jul 2017

एमपीसी न्यूज - भुशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने पुण्यातील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

संतोष सोनकांबळे (वय 23, रा. हडपसर, मूळ अक्कलकोट), असे या युवकाचे नाव आहे. 

संतोष हा त्याच्या चार ते पाच मित्रांसमवेत भुशी धरण परिसरात फिरायला आला होता. पुण्यातील एका कंपनीत तो कामाला होता. लोणावळा परिसरातील भुशी धरण व धरणाच्या वरील बाजुला डोंगरातील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. डोंगरातील धबधब्यात मित्रांसमवेत संतोष हा वर्षाविहाराचा आनंद घेत खेळत असताना पाय घसरून दगडावर पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.

यावर्षी लोणावळा परिसरात झालेली ही पहिलीच दुदैवी घटना आहे.

16 Jul 2017

लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने मोठी वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - भुशी धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी धरणाच्या पायर्‍यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने धरणाच्या पायर्‍यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. आज मात्र पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पुन्हा धरणाच्या पायर्‍या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्याने पर्यटकांनी जल्लोष केला.

मागील चार दिवसांपासून लोणावळ्यात पावसाचा जोर वाढल्याने आज रविवारच्या सुट्टी व वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने राष्ट्रीय महामार्गासह भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर आज सकाळ पासूनच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. द्रुतगती मार्गावर देखिल अंडा पॉईंट ते अमृतांजन पूल दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पुण्याकडे येणार्‍या लेनवर संथ गतीने वाहतूक सुरू आहे.

vahtuk kondi

14 Jul 2017


एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील जीवघेणी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केंद्रात तसेच राज्यात पाठपुरावा करण्याचे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. खासदार आपल्या दारी या उपक्रमाद्वारे बारणे यांनी लोणावळ्यातील समस्या, नगरपरिषदेच्या समस्या जाणून घेतल्या.

लोणावळ्यातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी महत्वाचा ठरणारा रिंगरोड सर्व्हे नं. 30 येथिल संरक्षण विभागाच्या जागेमुळे रखडला आहे. तसेच भांगरवाडी येथिल रखडलेला नियोजित रेल्वे उड्डाण पूल, रेल्वे गेट नं. 30 व 32 येथिल उड्डाण पूल या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्याचे आश्वासन बारणे यांनी दिले तसेच लोणावळा शहराच्या पर्यटन विकासात वाढ करण्यासाठी रेल्वेचे संग्रहालय लोणावळ्यात सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, नगरसेवक नितिन आगरवाल, सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, डॉ. किरण गायकवाड, आरोही तळेगावकर, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर, अंजना कडू, रचना सिनकर, सुवर्णा अकोलकर, प्रमोद गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष धमेंद्र शेट्टी, शिवसेना माजी शहरप्रमुख बबनराव अनसुरकर, संगिता कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते दहावीत लोणावळा शहरात प्रथम आलेल्या शरवरी मेढे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच भोंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तेजोरमयी बंडी व आरती गावडे यांनी कॅलिफोर्निया स्थित कॉम्पेटेटिव्ह एक्सचेंज या विभागीय स्तरावरील स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

14 Jul 2017

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील हाँटेल कैलास पर्बत समोर एक मोठे झाड कोलमडून पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

लोणावळा परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसासोबत जोराचा वारा देखील वाहत असल्याने हे मोठे झाड रस्त्यावरच तुटून पडले असल्याने अर्धा रस्ता व्यापला गेला आहे. झाड बाजुला काढण्याचे काम सुरु असून वाहतुक ऐकेरी मार्गाने सुरु आहे.

Page 5 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start