• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
27 Apr 2017

श्री एकविरा जोगेश्वरी अन्नदान ट्रस्टचा उपक्रम

 

एमपीसी न्यूज-  वेहरगाव कार्ला येथील श्री एकविरा जोगेश्वरी अन्नदान ट्रस्टच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील पंधरा जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. हा विवाह सोहळा एकविरा देवीच्या पायथ्याशी रविवारी (दि.23) सकाळी पार पडला. वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी पंचक्रोशीतील सर्वजण उपस्थित होते. सामुदायिक विवाहसोहळ्याची सुरूवात सकाळी साखरपुड्याने झाली. हळदीचा कार्यक्रम नवरदेवांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक तसेच सर्व पाहुण्यांसाठी श्रीट्रस्टच्या वतीने भोजनाची सोय करण्यात आली होती.

 

यावेळी या विवाह समारंभास मावळचे आमदार संजय बाळा भेगडे, माजी आमदार दिंगबर भेगडे, जेष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे, संत तुकाराम साखरकारखाना उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, शिवसेना नेते मच्छिंद्र खराडे, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशआप्पा ढोरे,तळेगाव उपनगराअध्यक्ष सुनिल शेळके,विवेक सोपरकर,जिल्हा परिषेद सदस्य बाबुराव वायकर, सदस्या कुसुमताई काशिकर, शोभा कदम, मावळ सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम पं. समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे, महादू उघडे, सदस्या राजश्री राऊत, संचालक साखरकारखाना ज्ञानेश्वर शिंदे, नगरसेवक गणेश भेगडे, श्री ट्रस्टचे अजय शिरोली, सरंपच निलम येवले उपसरपंच दत्तात्रय पडवळ, माजी सरंपच संतोष रसाळ उपसरपंच राखी पडवळ, ग्रा सदस्य सचिन येवले, चंद्रकांत देवकर, सदस्या कल्पना माने, सपना देशमुख, अमितकुमार बॅनर्जी, अमोल केदारी बिनेशभाई इनामदार, पंकज गदिया यांच्यासह हजारो व-हाडी मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

सोहळ्याचे संयोजन विवाह सोहळा समिती अध्यक्ष सुरेश गायकवाड, कार्याअध्यक्ष तानाजी पडवळ, संस्थापक अध्यक्ष मिलिंद बोत्रे, माजी अध्यक्ष भरतभाई मोरे, माजी अध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघ चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संजय देवकर किरण हुलावळे, संभाजी येवले, मधुकर पडवळ, बबनराव माने, राजू देवकर, रघूनाथ मराठे, गुलाबराव तिकोणे, नंदकुमार पदमुले, विवेक सोपरकर, रोहित सोपरकर चंद्रकांत देवकर, बबनराव माने, श्रीरंग पडवळ, किरण येवले, दशरथ देवकर, दतात्रय बोत्रे, वसंतराव माने, हुकाजी गायकवाड, नंदकुमार पदमुले, भरत येवले, संजय देवकर, दत्तात्रय मांडेकर, एकनाथ गायकवाड, मनोज देशमुख, युवराज पडवळ, नवनाथ पडवळ, मोरेश्वर पडवळ, रामभाऊ गोणते, रोहिदास हुलावळे, मंगेश देशमूख, संतोष गायकवाड, आदींनी केले होते.

 

या विवाहसोहळ्याचे प्रास्तविक भरत मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन जितेंद्र बोत्रे, किरण हुलावळे, तानाजी पडवळ यांनी केले.

27 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा धरणाजवळ मान्सून लेकच्या पाठीमागील गुलाब एंटरप्राइजेस येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून या महिलेचा पती त्यांच्या दोन मुलींसह फरार झाल्याचे समोर आले आहे.

 

सलमा परवेज खान (वय 38, रा. गुलाब एंटरप्राइजेस, मान्सून लेकच्या पाठीमागे, आय.एन.एस.शिवाजी रस्ता, लोणावळा) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

सदर महिला ही तिचा पती आणि दोन लहान मुलींसह मोलमजुरी करून राहत होती. पतीला दारूचे व्यसन असल्याने त्याच्याकडून या महिलेला नेहमीच मारहाण केली जात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. मागील 4 ते 5 दिवसांपूर्वीच पतीने डोक्यात काहीतरी मारल्याने ती महिला जखमी झाली होती. बुधवारी (दि. 26) सकाळी सदर महिला तिच्या घराच्या बाहेरील मोकळ्या जागेत मृतावस्थेत आढळून आल्याचे आणि तिचा पती त्यांच्या दोन लहान मुलींसह गायब असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

 

सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता महिलेच्या मृत्यूचे कारण हे तिला आलेला अशक्तपणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आय.जे.शेख हे करीत आहे.

27 Apr 2017

एमपीसी न्यूज - नारायण सेवा संस्थान, नारायणी नारी चेतना केंद्र व लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहर व परिसरातील वाड्या वस्त्यांमधील तब्बल सातशे आदिवासी महिलांना बुधवारी (दि.26) मोफत धान्य वाटप करण्यात आले.

 

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नारायणी सेवा संस्थानचे विश्वस्त मधुसुदन झुनझुनवाला, काशिप्रसाद मोरारका, परमेश्वर तुलसीयान, शामसुंदर बन्सारी, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद पाबळे, मावळचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष निखिल कविश्वर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, लायन्स व रोटरी क्लबचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

 


नारायणी सेवा संस्थानच्या वतीने मागील दहा वर्षापासून गरजवंतांना धान्य वाटप केले जाते. यावर्षी प्रथमच पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम घेत शहराच्या बाहेर दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी पाड्यांमधील महिलांना देखील हे धान्य वाटप करण्यात आले. सोबतच सर्व महिलांना जेवण देण्यात आले. राजमाची किल्ल्याकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या वनहाटी या वाडीवरील शाळेला प्रशासकिय साहित्य ठेवण्यासाठी कपाट व शालेय पोषण आहाराचे धान्य ठेवण्यासाठी पिंप भेट देण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा जाधव यांनी लोणावळा शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नारायणी धामने मदतीचा हात पुढे केल्यास नगरपरिषद व नारायणी धाम मिळून शहरात सीसीटीव्हीचे जाळे तयार करु असे सांगितले. एस.एम. देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा याबाबतची माहिती दिली. डीवायएसपी शिवथरे यांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी व गुन्ह्याची उकल करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, नगरपरिषदेने चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मदत करावी. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढावी अशी मागणी केली. नारायणी सेवा संस्थानचे मोरारका म्हणाले लवकरच आमचा येथे नेत्र व दंत चिकित्सा तसेच जनरल रुग्णालय सुरु करण्याचा मानस आहे. गरजवंतांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत पुराणिक व विशाल पाडाळे यांनी केले.

 

देशमुख यांचा विशेष सन्मान

 

महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सतत बारा वर्ष लढा देत पत्रकार संरक्षणाचा कायदा मंजुर करुन घेण्यासाठी मोलाचे कार्य केलेले पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांचा लोणावळा पत्रकार संघाच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक व राजकिय जीवनात धडाडीने काम करत शहराचे व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहोरात्र काम करणार्‍या नगराध्यक्षा सुरेखा जाधव व सामाजिक बांधिलकीतून काम करणारे नारायणी सेवा संस्थान यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

25 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील भांगरवाडीत एका बंद सदनिकेतून भरदिवसा चोरट्यांनी तब्बल 20 तोळं सोनं (7 लाख 66 हजार 200) रुपयांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला. याप्रकरणी सोमवारी रात्री दहा वाजता लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुनिता सुहास पवार (वय 34, रा. फ्लँट नं. 301, निर्मिती हाईटस, भांगरवाडी लोणावळा) यांनी याप्रकरणी घरफोडी झाल्याची फिर्याद दिली आहे.


पवार यांनी त्यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने बँकेच्या लॉकर मधून सोन्याची दोन मंगळसुत्रं, सोन्याच्या बांगड्या, लहान मुलांची सोन्याची चेन, कानातील झुमके, 3 लेडिज अंगठ्या, कानातील गोल रिंगा, वेढण्या, सोन्याचा नेकलेस, ब्रेसलेट, चांदीचे तीन तोळ्याचे ब्रेसलेट असे 7 लाख 66 हजार 200 रुपयांचे दागिने घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. सोमवारी सकाळी पवार दाम्पत्या कामाला गेले व मुलगा सोहम हा शिकवणीला गेला होता. घर बंद असल्याचा डाव साधत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी सकाळी 11:15 ते सायंकाळी 5:15 दरम्यान घराच्या लोखंडी दरवाज्याचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटामधील दागिने पळविले. सोहम व सुनिता सायंकाळी 5:30 वाजता घरी आल्यानंतर सदर चोरीची घटना उघड झाली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

24 Apr 2017

एमपीसी न्यूज - वाहतूक नियमांचा भंग करत भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या तब्बल 200 वाहनांवर लोणावळा शहरात व वरसोली टोलनाक्यावर कारवाई करत 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कुमार चौकात लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सुनील मुळे, पोलीस नाईक अनंत रावण, सामील प्रकाश, वाहतूक मदतनिस सतिष ओव्हाळ, दर्शन गुरूव, अंकूश गायखे यांच्या पथकाने विशेष कारवाई मोहीम राबवत 120 वाहनांवर कारवाई करत तब्बल 30 हजार रुपये दंड वसुली केली. तसेच दारू पिऊन वाहन चालविणार्‍या 3 जणांवर खटले दाखल करण्यात आले.


लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्यासह लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार माळी व पथकाने वरसोली टोलनाका येथे या विशेष मोहिमे अंतर्गत 80 वाहनांवर कारवाई करत 16 हजार रुपये दंड वसूल केला.


दुचाकी वाहन चालकांची तपासणी, वाहन परवाना, हेल्मेट, लेन कटिंग, अवैध प्रवासी वाहतूक, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सिट दुचाकी चालविणे आदी नियमान्वये ही कारवाई करण्यात आली.

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - पवना धरणात काल (रविवार) बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने हे शोधकार्य केले. दोन्ही मृतदेह आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सापडले.

 

जितेश पगार (वय 19, नाशिक), अनिकेत निकम (वय 20, साक्री, धुळे), अशी पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

 

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात ब्राम्हणोली गावच्या हद्दीत पवना धरणावर जितेश व अनिकेत दोघेही आपल्या अन्य चार मित्रांसमवेत पवना धरणावर काल (रविवार) सायंकाळी फिरायला आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्यात पोहताना व खेळताना जितेश व अनिकेत पाण्यात बुडाले असल्याचे समजले.

 

विद्यार्थी बुडाल्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह लोणावळा ग्रामीणचे पोलीस व शिवदुर्ग या रेस्क्यू टीमने धरण परिसरात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.  दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अखेर दोघांचेही मृतदेह सापडले.

 

शिवदूर्गच्या अजय शेलार, प्रवीण देशमुख, विकास मावकर, अमोल परचंड, राजू पाटील, नागेश इंगुळकर, दिनेश पवार, विशाल शेलार, सागर कुंभार, अजय राऊत, आनंद गावडे, महिपती मानकर, महेश मसने, प्रशांत  इकारी, हनुमंत भोसले, हरिश्चंद्र गुंड, सुनील गायकवाड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सर्व टीमचे आभार मानन्यात येत आहे.

21 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर तिरडीचा उतारा व मृत्यूपत्र ठेवणारा भोंदूबाबा संतोष पिंजण याला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली असली तर हा जादूटोणा करायला लावणारा घटनेच्या मागील मुख्य सूत्रधाराला दोन दिवसात अटक करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आंदोलन करण्याचा इशारा लोणावळा शहर भाजपाने लोणावळा शहर पोलिसांना निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, दादा धुमाळ, नगरसेवक बाळासाहेब जाधव, भरत हारपुडे, देविदास कडू यांनी शहर पोलिसांना हे निवेदन दिले आहे.

 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर 15 एप्रिल रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी येथील बुवाबाजी करणारा संतोष पिंजण याने तिरडीचा उतारा व सोबत नगराध्यक्षा जाधव यांचा मृत्यू 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालयात सकाळी 11 वाजता अॅटॅकने होणार असल्याचे मृत्यूयंत्र रेखाटून ठेवले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पिंजणला लोणावळा पोलिसांनी अटक केली असून तो सध्या तीन दिवस पोलीस कस्टडीत आहे. मात्र, संतोष पिंजण याला मी वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यामुळे तो स्वतःहून, असे कृत्य करणार नाही. त्याला हे लोणावळ्यातीलच कोणी तरी करायला लावले आहे, असा आरोप करत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पडद्यामागील खर्‍या सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी केली आहे.

18 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निश्चित करून तसे मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरडी यांचा उतारा त्यांच्या घराच्या दरवाजापुढे ठेवणाल्या प्रकरणी एकास लोणावळा शहर पोलिसांनी आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. अंधश्रद्धेचा कळस गाठणारी सदर घटना दोन दिवसांपूर्वी उघड झाल्यानंतर सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध नोंदविला होता.

 

संतोष पिंजण असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव या शिवसेनेचे नगरसेवक शिवदास पिल्ले यांच्या मुलाच्या लग्नासाठी केरळला गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोर असा घृणास्पद आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडला होता. सदर उताऱ्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यू यंत्र रेखाटण्यात आलेले होते. त्यावर श्रीमती जाधव यांच्या मृत्यूची दिनांक, वेळ, ठिकाण व मृत्यू कसा होणार या सर्वांचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये मंगळवारी दिनांक 25 एप्रिल 2017 रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी यावेळी तुंगार्ली येथील नगरपरिषद कार्यालयात श्रीमती जाधव यांचा अटॅकने मृत्यू होणार असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आले होते.

 

लोणावळा पोलिसांना या घटनेची रविवारी सकाळी खबर मिळाल्यानंतर त्यांनी सदर उतारा त्या ठिकाणीवरून हटवला होता.  सुरेखा जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करुन असा प्रकार करणार्‍यांवर कडक कारवाईची मागणी केली होती. आज रात्री त्या केरळवरुन घरी आल्यानंतर घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये संजय पिंजण हे दारासमोर उतारा ठेवताना दिसत आहे, तसेच पिंजण व त्यांचा मुलगा गाडीवरून येताना व जाताना स्पष्ट दिसत असल्याने त्यांना तातडीने शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबात शहरात वार्‍यासारखी बातमी पसरल्याने जाधव समर्थकांनी शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत पिंजण याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

18 Apr 2017
एमपीसी न्यूज - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशान्वे लोणावळा शहर पोलिसांनी सोमवारी 103 दुचाकी वाहनांवर कारवाई केली. यामध्ये 24 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला असून मद्या प्राशन करुन वाहन चालविणा-या तीन जणांवर खटला दाखल केला आहे. 
 
 
कुमार चौकात राबविलेल्या विशेष कारवाई व वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, अल्पवयीन मुले, राँग साईडने वाहन चालविणे, हेल्मेट नसणे, अशा तब्बल 103 दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. 
 
दुचाकींच्या वाढत्या अपघातांना नियमांचा भंग करत वाहन चालविणे हे मुख्य कारण असल्याने दुचाकी वाहन चालविणार्‍यांची तपासणी करण्याच्या सूचना नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनचालक विना लायसन्स गाडी चालविताना तसेच अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 
17 Apr 2017

एमपीसी न्यूज - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशान्वये लोणावळा शहर पोलिसांनी आज सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा दरम्यान कुमार चौकात राबविलेल्या विशेष कारवाई व वाहन तपासणी मोहिमेत विना लायसन वाहन चालविणे, अल्पवयीन मुले, राँग साईडने वाहन चालविणे अशा 51 दुचाकी वाहनांवर कारवाई करत 13 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला तर ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका येथे 1 दुचाकी वाहनांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला.

 

दुचाकी अपघातांच्या वाढत्या अपघातांना नियमांचा भंग करत वाहन चालविणे हे मुख्य कारण असल्याने दुचाकी वाहन चालविणार्‍यांची तपासणी करण्याच्या सूचना नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनचालक विना लायसन्स गाडी चालविताना तसेच अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना मिळून आली आहेत. सायंकाळी देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

Page 14 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start