• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
11 Sep 2017

Lonavala : वरसोली टोलनाका परिसरातून सिगारेट बाॅक्सने भरलेला कंटेनर पळविला


एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. चार वरुन सिगारेटच्या बाॅक्सने भरलेला एक कंटेनर वरसोली टोलनाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री पळवून नेला. या कंटेनर मध्ये 1 कोटी 87 लाख 54 हजार 817 रुपये एवढ्या किंमतीच्या सिगारेट होत्या. 15 लाख रुपये किंमतीचा कंटेनर  व रोख रक्कम, मोबाईल संच, सिगारेट असा मिळून 2 कोटी 2 लाख 63 हजार 317 रुपयांचा माल लंपास केला आहे.

याप्रकरणी कंटेनर चालक कलाम अहमद शमी खान ( वय 41, रा. नवरंग कंपनी प्लाॅट नं. 17 धारावी मुंबई) यांनी नाशिक येथील  नांदगाव पोलीस ठाण्यात मालासह कंटेनर चोरुन नेल्याची फिर्याद दिली होती. नाशिक पोलिसांनी  याप्रकरणी भादंवी कलम 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करत तो तपासासाठी नुकताच लोणावळा ग्रामीण पोलीसांकडे वर्ग केला आहे. 

खान यांच्या फिर्यादीनुसार काळ्या रंगाच्या स्काॅर्पीओ गाडीमधून आलेल्या आठ ते दहा अज्ञात चोरट्यांनी पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. चार वर वरसोली टोलनाक्यापासून साधारण एक किमी अंतरावर कंटेनर क्र. (MH 12 HD 6008) ला अडवून चालकाला बेदम मारहाण करत त्याचे हातपाय व डोळे बांधून कंटेनर पळवून नेला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.