• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

जप्त केलेली टपरी परत द्या, नाहीतर आमरण उपोषणाचा इशारा


टपरी चालकाचे ग्रामीण पोलीस व आयआरबीच्या विरोधात बंड

एमपीसी न्यूज - वरसोली टोलनाक्यालगत मागील अनेक वर्षापासून चहा, वडापाव विक्रीचा व्यावसाय करणार्‍या टपर्‍यांवर मागील आठवड्यात आरआरबी कंपनीने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. हे करत असताना सर्व टपर्‍या जागीच ठेवत तुळशीराम पिंगळे यांची टपरी मात्र जप्त करुन नेहण्यात आली आहे. ह्या टपरीत तीन हजार रुपये रोख व साहित्य मिळून 50 ते 60 हजारांचा माल असल्याने मला रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचे निवेदन पिंगळे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस व वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे.


माझी जप्त केलेली टपरी मला परत द्या, अन्यथा टपरी पथारी हातगाडी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे, लोणावळा अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण व वेळप्रसंगी कुचुंबियासमवेत सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा पिंगळे यांनी दिला आहे. उद्योजक विलास विकारी यांच्या सांगण्यावरुन माझी टपरी उचलून नेण्यात आली असल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे.

कायदा सुव्यवस्था बिघडविल्यास कडक कारवाई

तुळशीराम पिंगळे यांचे निवेदन प्राप्त होताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पिंगळेला सिआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावली असून वरील निवेदनाच्या आधारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास कडक कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. तसेच आपली टपरी ही आयआरबीने पोलीस संरक्षणात काढली आहे. त्यामध्ये आमचा संबंध नाही तुम्ही योग्य त्या कोर्टात न्याय मागा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start