• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

रोटरी क्लबच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज - समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्था यांचा रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने आज कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्यंकटराव भताणे, लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस व रोटरी क्लबचे अध्यक्ष बापु पाटील यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात आले. यावेळी मनशक्ती केंद्राचे संचालक प्रल्हाद वाफाळे, एकविरा प्रतिष्ठानचे संचालक निवृत्ती देशमुख, उत्तरा पर्यावरण शाळेचे प्रमुख निलमकुमार खैरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार नवनाथ देशमुख आदी मान्यवर व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना बापु पाटील म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजात काम करत असताना शिक्षण, समाजकार्य, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात काही मंडळी व्यक्तीगत रित्या तर काही संस्थाच्या माध्यमातून आत्मियतेने काम करत असल्याचे निदर्शनास आले. अशा मंडळींचा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा मानस मनाशी बाळगत रोटरी क्लबच्या वतीने यावर्षी प्रथमच नविन उपक्रम हाती घेत लोणावळा व ग्रामीण परिसरातील 35 जणांना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना व्यंकटराव भताणे म्हणाले, समाजात आपण निस्वार्थपणे व कोणतीही अपेक्षा न धरता काम करत असताना रोटरी सारख्या संस्था आपल्या कामाची दखल घेत आहे हे पुरस्कार्थीसाठी गौरवास्पद आहे. विनय विद्वांस यांनी सर्व पुरस्कार्थीचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कुलकर्णी यांनी केले तर रोटिरियन वानखेडे यांनी आभार मानले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start