• mahesh_kale_1250by200.jpg
11 Jan 2018

Lonavala : माजी नगराध्यक्षा उषा चौधरी यांच्या घरात चोरी; 13 लाखांचा ऐवज लंपास


मालमत्तेच्या वादातून चोरी झाल्याचा आरोप

एमपीसी न्यूज - लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा उषा अशोक चौधरी या भाड्याने रहात असलेल्या घरात चोरी झाली असल्याची फिर्याद चौधरी यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. मालमत्तेच्या वादातून ही चोरी झाली असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला असल्याने या चोरीबाबत परिसरात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. ही घरफोडी बुधवार (दि. 10) रोजी सायंकाळी साडेचा ते साडेनऊच्या दरम्यान झाली असून यामध्ये रोख रक्कमेसह सोन्या च‍ांदीचे दागिने व इतर साहित्य असा 12 लाख 92 हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरीस गेला आहे.

चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अस्लम सुदुवा खान (रा. खोपोली, रायगड), रुपाली पुळेकर (रा. खोपोली, रायगड), विपूल विश्वकर्मा (रा. तुंगार्ली, लोणावळा), सोहेल अस्लम खान (रा. लोणावळा), रितेश पुळेकर (रा. खोपोली, रायगड), शकिल बेहलिम (रा. गावठाण, लोणावळा), अस्लम खानचा भाऊ (पूर्ण नाव माहीत नाही), कलंदर (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) मछली रेस्टॉरंट चालविणारा इसम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, व त्यांचे अज्ञात साथीदार, यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ज्ञानेश दिवेच्या  याचा दत्त कुटिर हा बंगला 1991 साली उषा चौधरी यांनी भाड्याने राहण्याकरिता घेतला होता. या जागेचा 2006 साली दिवेच्या यांच्याकडून अशोक चौधरी यांनी साठेकरार करुन घेतला होता. मात्र दिवेच्या यांच्या मृत्यूनंतर सदर जागा ही दिवेच्या यांची बहीण कष्मिरा पेटीगिरा व मुली अनुक्रमे रेश्मा मोदी व कोमल धांदा यांनी खोपोलीतील अस्लम शेख यांना विक्री केली. मात्र चौधरी यांनी बोगस साठेकरार करत सदरची जागा ताब्यात घेतली असल्याचा आरोप करत त्यावेळी कष्मिरा यांच्या फिर्यादीवरुन चौधरी व इतर यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तदनंतर चौधरी यांनी कष्मिरा व अन्य यांच्या विरोधात 2010 साली दिवाणी न्यायालयात साठेकरारावरुन केस दाखल केली होती. दोनच दिवसापूर्वी सदरचा निकाल हा चौधरी यांच्या विरोधात गेल्याने अस्लम शेख व इतर यांनी दत्त कुटिर या जागेच्या दरवाजाला कुलूप लावत चौधरी यांना मालमत्तेत येण्याकरिता मज्जाव केला होता. बुधवारी (दि.10) चौधरी दुपारी कुटुंबासमवेत वैयक्तिक कामाकरिता पुण्याला गेल्या असताना सदरची घरफोडीची घटना घडली असल्याचा यांचा दावा त्यांनी केला आहे.

आरोपींनी त्यांच्या घराच्या मागील खिडकीच्या लोखंडी ग्रिल कापून घरात प्रवेश करीत घरफोडी केली. घरफोडीत एकूण रोख चार लाख रुपये, 35 तोळ्याचे सोन्याचे दागिने, सॅमसंग कंपनीचा एल ए डी टीव्ही, टाटा स्काय डिश, स्पीकर, सोनी कंपनीचा सी.डी. प्लेअर, असा एकूण 12 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares