• mahesh_kale_1250by200.jpg
08 Jan 2018

Lonavala : ओमकार तरुण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना टी शर्ट व शूजची भेट


एमपीसी न्यूज- ओमकार तरुण मंडळाच्या वतीने तुंगार्ली येथील लोणावळा नगरपरिषदेच्या स्वा. सावरकर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना टी शर्ट, पायातील बूट व मोजे भेट देण्यात आले. तसेच बालवाडीच्या मुलांकरिता दोन बाबा सायकल भेट देण्यात आल्या.


ओमकार तरुण मंडळाच्या वतीने विविध भागात सातत्याने सामाजिक उपक्रम सुरु असतात. सध्या थंडी असल्यामुळे मंडळाच्या वतीने रमेश वर्मा, शुभम गावडे, मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पिंगळे यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक कोंडीबा येवले, मंडळाचे उपाध्यक्ष विजय येवले, नितीन गायकवाड, शुभम गावडे, पंढरीनाथ वाडेकर, सतीश गावडे, प्रमोद खिल्लारे, किरण येवले, किशोर पवार, संजय उतेकर, रघुनाथ मावकर, प्रसाद मावकर, विशाल बच्चे, मयूर बोरकर, प्रमोद कुटे, प्रकाश गवळी, प्रकाश धनकवडे, शाळेच्या मुख्याध्यापिका महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares