• mahesh_kale_1250by200.jpg
08 Jan 2018

Lonavala : अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनात लोणावळा शाखेला सहा मानांकने


एमपीसी न्यूज- अखिल भारतील मारवाडी महिला संघाच्या नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या प्रांतिक अधिवेशनात उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल लोणावळा शहर शाखेला सहा मानांकने देण्यात आली.


अखिल भारतीय मारवाडी महिला संघाच्या प्रांतिक अध्यक्षा रेखा राठी यांच्या हस्ते लोणावळा शाखेच्या अध्यक्षा साधना टाटीया व डाॅ. स्वाती पारख यांना  पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी सचिव सुनंदा लाहोट, कोषाध्यक्षा नंदा मुथा, राष्ट्रीय अध्यक्षा मीना गुप्ता, सचिव सुषमा अग्रवाल, माजी अध्यक्षा शारदा मोहाडिया, सावित्री बाफना, रजनी मेहता, प्रेमाजी पंसारी आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.  अधिवेशनात नूतन प्रांतिक अध्यक्षपदावर पद्मा गोयंका यांची निवड जाहीर करण्यात आली.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares