• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Lonavala : राज्य कुस्ती स्पर्धेत मावळातील चार युवा मल्ल सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाचे मानकरी

एमपीसी न्यूज -महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी येथे पार पडलेल्या ऑलंपिक पदक विजेते कै. खाशाबा जाधव चौथ्या युवा (ज्युनिअर) फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमण आणि 40 व्या कुमार राज्य अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील चार युवा मल्लांनी पदके पटकाविली आहे. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य व एका कांस्य पदकाचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ऑलिम्पिक पदक विजेते कै. खाशाबा जाधव चौथी युवा (ज्युनिअर) फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन आणि 40 व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नुकतीच पनवेल, रायगड येथील कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या मैदानावर पार पडली. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील चार युवा मल्लांची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने निवड झाली होती. या चारही मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली आहे. यामध्ये युवा (ज्युनिअर) ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात आढले खुर्द येथील पै. तुषार मोहन येवले याने 82 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. तुषार याने यापूर्वी जानेवारीमध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत 84 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, तसेच फेब्रुवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय युवा ग्रीकोरोमण कुस्ती स्पर्धेत 82 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले होते.

शिवली येथील आतिश रामदास आडकर याने ग्रीकोरोमन प्रकारामध्ये 63 किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केले आहे. वारू येथील अनिल दत्तात्रय कडू याने कुमार गटातील ७१ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले आहे. कडू याने मागीलवर्षी धुळे येथे झालेल्या कुमार अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेतही 69 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले होते.

त्याचप्रमाणे उर्से येथील संकेत दामू ठाकूर याने कुमार गटातील 51 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले असून, संकेतने दोन वर्षांपूर्वी हिंगोली येथे झालेल्या कुमार अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत 42 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले होते.

पदक विजेत्या सर्व कुस्तीगीरांचे मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सहयोगी उपाध्यक्ष व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मारुती आडकर, कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते पै. चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस मारुती बहिरु आडकर, आमदार बाळा भेगडे, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, उपाध्यक्ष पै. खंडू वाळुंज, पै. सचिन घोटकुले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव पै. बंडू येवले, पै. पप्पू कालेकर यांनी अभिनंदन केले आहे.