• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Lonavala : मुख्याधिकार्‍यांची बनावट सही करत बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल


एमपीसी न्यूज-
 लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची खोटी व बनावट सही करत वलवण गावातील एका बंगलेधारकाला रेन शेड (पावसाळी शेड) बांधण्याकरिता ना हरकत परवानगी देण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाल्यानंतर आज लोणावळा शहर पोलीस ठाण्यात लोणावळा नगरपरिषद व फसवणूक झालेल्या बंगले धारकाने तक्रार अर्ज दाखल केला आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या लेटरहेडची चोरी करत त्यावर नगरपरिषदेचा जावक क्रमांक टाकत मागील महिन्यात 13 नोव्हेंबर 2017 रोजी वलवण गावातील लोढा गोल्ड क्रेस्ट सीएचएस लि. येथिल प्रफुल्ल राणावत यांच्या बंगल्याला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत परवानगी मुख्याधिकार्‍यांची बनावट सही करत देण्यात आली असल्याचा प्रकार  नगरसेवक सुनिल इंगूळकर यांनी उजेडात आणल्याचे वृत्त  लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर सोशल मिडीयावर याच्या संतप्त प्रतिक्रिया उमठली होती तसेच नगरपरिषद परिसर व लोणावळा शहरात चर्चेला उधान आले होते. याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात नगरपरिषदेच्या वतीने संजय कदम यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

फसवणुक झालेले बंगलेधारक राणावत यांनी आज नगरपरिषदेत येत 
लोढा गोल्ड क्रिस्ट येथे स्थानिक व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या मसुरकर नावाच्या व्यक्तीने आमच्याकडून 40 हजार रुपये घेत हा ना हरकत परवाना दिला असल्याचे सांगितले. दरम्यान हा परवाना बोगस असल्याचे समोर आल्यानंतर राणावत हे देखिल फसवणुक झाल्याची तक्रार दाखल करणार आहेत. मसुरकर ही व्यक्ती नेमकी कोण असून हा सर्व प्रकार त्याने कोणाच्या सांगण्यावरुन केला, लेटरहेड कोठून मिळविले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले अाहेत.