• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
18 Sep 2017

पुणेकरांना मिळणार पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू बघण्याचा दुर्मिळ योग

एमपीसी न्यूज - पारंपरिक हस्तकला करणा-या कारागिरांना  प्रोत्साहित करण्यासाठी हॅन्ड्स ऑफ इंडियातर्फे वस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात हाताने तयार केलेले 10 प्रकारचे भरतकाम पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये पंजाबमधील फुलकारी, चिकण, उत्तर प्रदेशातील पत्तीवर्क आणि आरी, पश्चिम बंगालमधील कांथा आणि इंग्लीश कढाई, बिहारमधील सुजनी, कश्मीरची सुझनी व कर्नाटकाची कसुटी इत्यादी कलांचा समावेश आहे. हे प्रदर्शन पुण्यात दुसऱ्यांदा भरविण्यात आले आहे.
 
टिळक स्मारक मंदिर येथे हे प्रदर्शन गुरुवार  (दि.21) ते रविवार (दि.24) पर्यंत सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.

हातमाग, हस्तकला, हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे या उद्देशातून हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत. आज यंत्रणेच्या मोठ्या वापरामुळे  हस्तकला हळूहळू लोप पावत चालल्या असून या कलांना टिकवून ठेवण्याचे कार्य हॅन्ड्स अॉफ इंडियातर्फे करण्यात येते.
04 Jul 2017

'नेमेचि येतो मग पावसाळा I हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा' अशी उक्ती आहे. दरवर्षी पावसाळा येतो. कधी कमी तर कधी भरपूर, अगदी सरासरीपेक्षा अधिक. उन्हाळ्याची तलखी वाढली की प्रत्येकजण पावसाच्या चिंब भिजवणाऱ्या सरींची आतुरतेने वाट पाहत असतो. केंव्हा एकदा पाऊस येतो आणि वातावरण थंड होते असे होऊन जाते. पावसाळ्यात भिजण्याची आवड नसेल तर कोणते कपडे घालावेत हा प्रश्न अनेकांना पडतो.

पावसाळी वातावरण सुरु झाले की प्रत्येक घराघरात धांदल उडालेली असते. माळ्यावर अडगळीत टाकलेले रेनकोट, छत्र्या खाली येतात. छत्र्यांची दुरुस्ती होते. किंवा सेलमध्ये नव्या छत्रीची खरेदी होते. यंदा सरासरीपेक्षा दोन ते तीन टक्के पाऊस अधिक होणार असे भाकीत हवामान खात्यावे वर्तवलेले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

आता विषय असा आहे की पावसाळ्यात कोणते कपडे घालायचे ? कारण पातळ कपडे वापरले तर हवेतील गारवा अधिक जाणवतो. पातळ कपडे लवकर वाळतात. पण संततधार पाऊस पडत असेल तर ओलाव्यामुळे प्रचंड थंडी वाजते. वूलनचे कपडे तर वापरणे शक्यच नाही. मग नेमके कोणते कपडे घालायचे असा प्रश्न साहजिकच पडतो.

पावसाळ्यात शक्यतो पातळ सुती कपडे वापरा. किंवा सिंथेटिक कपडे वापरले तरी चालतील. होजिअरीचे कपडे घातले तर उबदारपणाही मिळतो. जीन्स घालणे मात्र टाळा. कारण जीन्स भिजली की लवकर वाळत नाही. हल्ली टाईट जीन्स घालायची फॅशन असल्यामुळे एकदा ती भिजली की अंगावरून काढणे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. ऑफिसला जाताना ऊन असेल तर कधी कधी रेनकोट सोबत घ्यायला विसरतो. त्यामुळे पावसात हमखास भिजायला होते. त्यासाठी कपड्यांचा एक सेट ऑफिसमध्ये ठेवा.गडद रंगाचे कपडे वापरावेत. भिजलात किंवा कपड्यांवर चिखल उडाला तरी तो सहज दिसणार नाही, शिवाय रंग ही खराब होणार नाही.

रंग जाणारे कपडे कधीही वापरू नका. कारण रंग इतर कपड्याने लागू शकतो. त्यामुळे रंग न जाणारे, लवकर वाळणारे कपडे निवडा. थ्री-फोर्थ पँट्स, लेगिंग्ज, अँकल लेंग्थ किंवा नी लेंग्थ ड्रेसेस निवडता येतील. त्याचप्रमाणे पायात नेहमी पावसाळ्यात चालणाऱ्या चपला किंवा बूट वापरावेत. कारण चामड्याच्या पादत्राणांना बुरशी येते. बॅग्ज, पर्सेस, पाठीवरची सॅक वॉटरप्रूफ असाव्यात म्हणजे म्हणजे पैसे, कागदपत्रं सुरक्षित राहतील.

एवढा सगळा जामानिमा केल्यानंतर पावसात मनसोक्त भटकंती करा. मनात आलंच तर आपली तब्येत सांभाळून उतरून द्या हा पावसाळी पोशाख आणि चिंब भिजा या जलधारांमध्ये. मस्तपैकी वाफाळलेला चहा, गरमागरम कांदाभजी, वडापाव यांचा आस्वाद घ्या आणि या वर्षावाचा मनमुराद आनंद लुटा.

Page 1 of 2