• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
16 Aug 2017

देवदत्त कशाळीकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज- उत्तम निरीक्षण करणारा  उत्तम  छायाचित्रण  करू शकतो. उत्तम निरीक्षणाद्वारे प्रत्येक क्लिक मधून  विजयानगरच्या  वैभवशाली   दुनियेचे  यथार्थ  दर्शन  देवदत्त कशाळीकर यांनी घडविले  आहे  असे  मत आयुक्त  श्रावण हर्डीकर  यांनी 'the  lost  empire' या  छायाचित्र  प्रदर्शनाच्या उदघाटन  प्रसंगी  व्यक्त केले.

स्वातंत्र्यदिनाच्या  दिवशी  पु .ना . गाडगीळ  कलादालनामध्ये  हंपीमधील  छायाचित्रांचे प्रदर्शनाच्या  उदघाटन  प्रसंगी जागतिक कीर्तीचे  चित्रकार  रवी परांजपे, खासदार श्रीरंग  बारणे, महापौर नितीन काळजे, आयुक्त  श्रावण हर्डीकर, पक्षनेते  एकनाथ पवार, अजित गाडगीळ, अमित गोरखे, समीर परांजपे , ओंकार भिडे,  सचिन पटवर्धन, नगरसेवक  राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी  चिंचवडे, अपर्णा डोके, सुरेश  भोईर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती   नाना  शिवले, गोरख  भालेकर, सहआयुक्त  दिलीप गावडे, अण्णा  बोदडे उपस्थित होते.

आयुक्त पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड या मोठया विकसित नगरीमध्ये कालच पालिकेने लोकार्पित केलेले नवे स्वरूपातील  वेब पोर्टलवर आपल्या शहरातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांवर आधारित  फोटो व  फोटो  स्टोरी  रोजच्या रोज अपलोड  करून  शहराविषयी माहिती व  कुतूहल  निर्माण करून जगाला आपल्या शहराची ओळख करून देऊ शकतो. हे काम करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी देवदत्त कशाळीकर याना दिल्या. कशाळीकर यांनी छाया प्रकाशाचा  उत्तम   वापर केला असल्याचे  मत त्यांनी व्यक्त केले  

ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रकार  रवी परांजपे  म्हणाले की, जगाच्या  कानाकोपऱ्यामध्ये   भारतीय  शिल्पकला  व इतिहास   पोहोचविण्याचे  काम  देवदत्त कशाळीकर यांनी केले आहे. एकनाथ  पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  

सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी  केले. आभार नाना शिवले  यांनी मानले.

A dEVDATTA 8
A dEVDATTA 1
A dEVDATTA 2
A dEVDATTA 3
A dEVDATTA 6
A dEVDATTA 7
A dEVDATTA 9
A dEVDATTA 10
A dEVDATTA 11

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे निगडी, प्राधिकरण येथील चिंचवड बधीर मूक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या 140 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. 


निगडी, प्राधिकरणातील चिंचवड बधीर मूक विद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (दि.16) रोजी झालेल्या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, शाळेचे प्राचार्य विकास पाटोळे, रोटरीच्या सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले,  रो. सदाशिव काळे, रो. राजेंद्र भोसले, सामाजिक कार्यकर्ते गणेश टिळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा पांगारे म्हणाल्या, " रोटरी क्लब आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी कार्य करीत आहे. चिंचवड बधीर मूक शाळा चांगले कार्य करत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागत आहे. शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दाताची तपासणी करण्यात आली असून रोटरीचा हा सर्वांत चांगला उपक्रम आहे"  

राम भोसले म्हणाले, " दात किडण्याचे मुख्य कारण आपल्या आहारात जे पिष्ठमय पदार्थ येतात ते दातांच्या फटीमध्ये अडकून बसतात. त्यावर आपल्या तोंडातील जंतूंचा संसर्ग होऊन आम्ले तयार होतात. त्यामुळे दाताचे विविध आजार होतात. विद्यार्थ्यांनी  दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली पाहिजे "

पाचवी ते दहावीच्या वर्गातील 140 विद्यार्थ्यांच्या दाताची तपासणी करण्यात आली. 35 विद्यार्थ्यांना दाताचे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात रोटरीतर्फे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाचे डॉ. अनमोल मॅथू, डॉ. अमृता बेलाब, डॉ. सलोनी भारदारी, डॉ. अर्चना चव्हाण, डॉ. सोनल कोले यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. 

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशल फेडरेशनचा 37 वा स्थापना दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती देण्यात आली. 

निगडी, प्राधिकरण येथील मनोहर दत्तात्रय वाढोकर सभागृहात मंगळवारी (दि.15) रोजी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सोशल ग्रुप डायमंडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अनुप शहा होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे शरद शहा, लालचंद जैन, सतिश बाफना, मनीष शहा, प्रवीण चोपडा, हसमुख जैन, डॉ. राजेश दोशी, अनिता शहा, सौरभ शहा आदी उपस्थित होते. 

जैन सोशल ग्रुप डायमंडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अनुप शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. स्वच्छता अभियानावर प्रबोधनात्मक नाटक सादर करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी आणि मंगल पाडे यांच्या कार्याचा संदेश सभासदांनी नृत्यातून दिला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जैन यांनी केले. तर, पंकज गुगळे यांनी आभार मानले. सभासद स्वप्निल शेट, जय मेहता, प्रशांत गांधी, नरेश शहा, डॉलिबेन पटेल, गीता गुगळे, अतुल धोका, सिद्धार्थ शहा यांनी संयोजनात पुढाकार घेतला. 

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- सिहगडावर जाणाऱ्या घाटरस्त्यावर दरड कोसळत असल्यामुळे हा रस्ता अजूनही वाहतुकीला बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

नऊ किलोमीटरच्या घाटरस्त्यावर यंदा 15 दिवसात दोन वेळा दरड कोसळली आहे. सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर सुमारे दहा हजार पर्यटक येत असतात. या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घाटरस्ता वाहतुकीला बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयआयटी च्या तज्ञाकडून तपासणी केली आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत गड वाहतुकीला बंद ठेवला जाणार आहे असे वनविभागाने कळविले आहे.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती. मात्र राज्य शासनाने याबाबत प्राण्यांना इजा होणार नाही याची स्पष्ट नियमावली न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या खेळाला तूर्त परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा राज्यात कोठेही या स्पर्धांच्या आयोजनाची परवानगी देण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘राज्य सरकारनं यासंदर्भात अधिसूचना काढली असली तरी जोपर्यंत बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा होणार नाही याविषयी सरकार नियमावली बनवत नाहीत आणि आमच्यासमोर सादर करून आम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही. असे उच्चन्यालयाने स्पष्ट करत दोन आठवड्यांत राज्य सरकारला यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला अजय मराठे यांनी याचिकोद्वारे मुंबई उच्चन्यायालयात आव्हान दिले होते. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून यामध्ये बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. ‘बैल हा धावण्याकरता नाही तर कष्टाची कामं करण्यासाठीचा प्राणी आहे.’ असंही याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारनं आव्हान दिलं नव्हतं, याचाच अर्थ राज्य सरकार बैलगाडी स्पर्धा बंदीच्या बाजूने असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानेही बैलगाडी स्पर्धा हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ नसल्याचं म्हटले होतं याचा उल्लेखही मराठे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

तर उलटपक्षी बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली होती. त्या विधेयकाची नोंदही 31 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात करण्यात आली आहे. तसेच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राजपत्राची प्रत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. राजपत्रात नोंद झाल्याने बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे असे समजले गेले मात्र या आनंदाला उच्चन्यालयाने ब्रेक लावला आहे. हा ब्रेक काढण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांत यासंदर्भात आपली भूमिका न्यायालया समोर स्पष्ट करावी लागेल.

महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिका-यांच्या परवानगीने बैलगाडा शर्यती आयोजित करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात येतील. सांस्कृतिक परंपरांना सुरू ठेवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. शर्यतीत वापरण्यात येणा-या प्राण्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचता कामा नये. अन्यथा संबंधितांवर पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड किंवा तीन वर्षापर्यंत कारावास होऊ शकणार आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले होते.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील सरकारी रुग्णालयात झालेल्या 70 हुन अधिक बालकांच्या मृत्यूची घटना देशाच्या आरोग्याला धक्का देणारी आहे. भारतासारख्या विकसनशील देशात असे घडावे ही खेदजनक बाब आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी स्वीकारावी व आपल्या पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.

ऑक्सीजन अभावी इतक्या मोठया संख्येने बालकांचा मृत्यू होणे धक्कादायक आहे. बाबा राघवदास सरकारी रूग्णालयाला ज्या कंत्राटदाराकडून ऑक्सिजन सिलींडरचा पुरवठा केला जात होता त्या कंत्राटदाराचे आधीचे बिल अदा न केल्याने त्याने ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा थांबवला. त्यातून बालके दगावली. या घटनेने रुग्णालय प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभार याचे दर्शन करून दिले आहे.

या प्रकरणाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा दिला पाहिजे. या मृत्यु कांडानंतर ज्या असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्या गेल्या, त्यामुळे सत्ताधारी पक्षाची असंवेदनशीलता प्रकट झाली आहे. त्यांचाही या निमित्ताने निषेध करावा, तितका थोडाच आहे, असेही खासदार चव्हाण म्हणाल्या.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 71 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मुख्यालयात महापौर नितीन काळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक राजू मिसाळ, विजय लोखंडे, मंहमद पानसरे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, सुलक्षणा शिलवंत, सिंधु पांढारकर, कविता खराडे, दिपाली लांडे, अरुणा कुंभार, मिनाक्षी उंबरकर, मुमताज इनामदार, सायुजता दोडके, पांडुरंग दोडके, मीनाताई मोहिते, कांचन कुरकुटे, लता ओव्हाळ उपस्थित होते.

नवी सांगवी येथे शिव प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार जनार्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे आध्यक्ष विक्रम धुमाळ, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आकाश पांचाळ, अमित मडई, संजय गंवंडाळकर, निलेश गाडेकर, प्रथमेश खूने, पंकज धाराशिवकर आदी उपस्थित होते.

यावेळी आण्णा जोगदंड यांनी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचे, व त्यांच्या सर्व नागरीकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती ,विश्वास , श्रदा व उपासना यांचे स्वतंत्र्य व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व बंधुता देणारे भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप केले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ध्वजवंदन समारोह उत्साहात पार पडला. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई , प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विभागात रस्ते, चौक, उड्डाणपूल, वाहनतळे, भुयारी मार्ग अशी विकासकामे केली जातात. या विकासकामांचे नामकरण करण्यासाठी प्रभागातील चार अथवा तीन नगरसेवकांची सहमती असणे आवश्यक ठरणार आहे. यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांचे एकमत न झाल्यास विकासकामाला नाव सुचविण्याचा अधिकार महापौरांना देण्यात आला आहे. महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकासकामे करण्यात येतात. या विकासकामांना नाव देण्यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांकडून नाव समितीकडे प्रस्ताव देण्यात येत असे. त्यावर प्रशासनाचा अभिप्राय घेतल्यानंतर नाव समिती निर्णय घेत असे. यंदा महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने पार पडल्या आहेत. विकासकामांना नाव देताना प्रभागातील चारही नगरसेवकांचे मत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाला नाव द्यायचे झाल्यास चार अथवा कमीत कमी तीन नगरसेवकांचे एकमत असणे आवश्यक आहे, अन्यथा महापौर आपल्या अधिकारात नाव सुचविणार आहेत. यासंदर्भातील धोरण निश्‍चित करण्यात आले आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांना काही नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांची नावे दिली होती. त्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कान उपटले होते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने नाव समितीचे धोरण तयार करण्यात आले. या समितीकडून विकासकामांना कोणते नाव द्यायचे याचा प्रस्ताव सादर करण्यात येतो.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अद्यावत संकेतस्थळाचे (www.pcmcindia.gov.in) महापौर नितीन काळजे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. नवीन संकेतस्थळामध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे टॅबलेट व मोबाईलधारक यांना संकेतस्थळ वापरण्यास सुसह्य होणार आहे. त्याकरीता संकेतस्थळ Responsive Pages च्या स्वरूपात सादर करण्यात आलेले आहे.

महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजेंद्र गावडे, नितीन लांडगे, संदीप वाघेरे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, नगरसेविका सुलक्षणा धर, मीनल यादव, अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, आशादेवी दुरगुडे, योगेश कडूसकर, विजय खोराटे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय,‍ अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रविंद्र दुधेकर, अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, रामदास तांबे, प्रवीण घोडे, श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, मकंरद निकम, प्रशांत पाटील, प्रविण लडकत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, मुख्य माहिती व तंञज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, बजरंग आवारी, रेखा गाडेकर, आशा राउत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विलास वाबळे, अग्नीशमन अधिकारी किरण गावडे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे www.pcmcindia.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन नव्याने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळास प्रतिमहीना सरासरी दीड ते दोन लाख नागरिक भेट देतात. संकेतस्थळ ठराविक कालावधीनंतर विविध सुविधांयुक्त नाविन्यपुर्ण स्वरूपात नागरिकांपुढे आणण्याचा महानगरपालिकेचा सतत प्रयत्न असतो. त्यास अनुसरून महानगरपालिकेने नवीन स्वरूपातील संकेतस्थळ विकसित केलेले आहे. नवीन संकेतस्थळामध्ये आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणेत आलेला आहे. जेणेकरुन अधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नव्याने विकसित झालेली संगणक यंत्रणा, टॅबलेट व मोबाईल फोन इत्यादीसाठी वापरणेत येणारे वेब ब्राउजरसाठी सदरचे संकेतस्थळ पूर्णत: सुसंगत असणार आहे.

शहरातील नागरिक पालिकेकडे विविध समस्यांसाठी विविध माध्यमांद्वारे तक्रारी दाखल करतात. संबंधित विभागाकडून तक्रारीचे निराकरण झाल्यावर ऑनलाईन तक्रार क्लोज केली जाते. मात्र ज्या तक्रारींच्या कार्यवाहीबाबत नागरिकांचे समाधान झालेले नाही अशी तक्रार नागरिकांना स्वत:चे लॉगीनद्वारे ऑनलाईन रि-ओपन करता येणार आहे. तसेच क्लोज केलेल्या तक्रारीबाबत स्वत:चा अभिप्राय (Feedback) नोंदविता येणार आहे.

नवीन संकेतस्थळामध्ये करणेत आलेल्या बदलामुळे टॅबलेट व मोबाईलधारक यांना संकेतस्थळ वापरण्यास सुसह्य होणार आहे. त्याकरीता संकेतस्थळ Responsive Pages च्या स्वरूपात सादर करणेत आलेले आहे. या संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्याचे कामकाज मुख्य माहिती व तंञज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सुधीर बोराडे आणि दिमाख सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे.

15 Aug 2017

पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत पुणे जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीच्या वतीने बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील साधू वासवानी चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विधान भवन येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याऐवजी एखाद्या शेतकरी किंवा शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बाबा आढाव म्हणाले की, शेतकऱ्यांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले असून आज स्वातंत्र्यदिनी या अपयशी सरकारमधील कोणत्याही मंत्र्यानी ध्वजारोहण करता कामा नये. या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेे. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा चालू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिली.

Page 9 of 290
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start