• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वाकड परिसरात चालू असलेल्या अनधिकृत बांधकामवर धडक कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (दि.16) करण्यात आली.

वाकड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. या चालू असलेल्या बांधकामावर बुधवारी पालिकेच्या अतिक्रम विभागाने कारवाई केली. या कारवाईत 2221 चौरस फुट असलेल्या दोन आरसीसी बांधकाम, 2606 चौरस फुट असलेल्या सात अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तर, पत्राशेड मालक, ऑक्युपायर, विकासक यांनी स्वत:हून सात अनधिकृत पत्राशेड काढून घेतली.

कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ट अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने दोन जेसीबी, एक ट्रक व 20 कर्मचा-यांच्या सहकार्याने केली. कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

18 Aug 2017

एमपीसी न्यूज - भाजपने ''नया भारत संकल्प के सिध्दी'' हे महाअभियान सुरु केले आहे. त्यासाठी प्रदेश समिती गठित केली असून पश्चिम महाराष्ट्राच्या संयोजकपदी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची गुरुवारी (दि.17) मुंबईत बैठक पार पडली. यावेळी ''नया भारत संकल्प के सिध्दी'' अभियानाच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी सदाशिव खाडे यांची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवड केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, संघटनमंत्री रवि अनासपुरे, सुजितसिंह ठाकूर, खासदार अमर साबळे, अॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2022 पर्यंत नवनिर्माण भारत करायचा आहे. गरिबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, जातीमुक्त भारत पंतप्रधान मोदी यांना करायचा आहे. त्यांच्या संकल्पाची माहिती गावा-गावांतील नागरिकांना देण्यासाठी ''नया भारत संकल्प के सिध्दी'' महाअभियानाची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे संयोजक आपल्या परिक्षेत्रात जाऊन जिल्हा, तालुका, गावपातळी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन बैठक घेणार आहेत. सदाशिव खाडे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असून संघटनातत्मक दहा आणि शासकीय पाच जिल्हे त्यांच्याकडे असणार आहेत.

सदाशिव खाडे गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. वॉर्डस्तरापासून जिल्हा अध्यक्षापर्यंत सर्व जबाबदा-या त्यांनी यशस्विरित्या पार पाडल्या आहेत. सध्या ते प्रदेश कार्यकारणी सदस्यपदावर कार्यरत असून उत्तम कार्य करत आहेत. भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंढे यांच्याबरोबर खाडे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यामुळे त्यांना पश्चिम महाराष्ट्राची राजकीय नाडी चांगल्याप्रकारे माहित आहे.

खाडे यांनी पिंपरी पालिकेच्या शिक्षण मंडळावर चांगल्या प्रकारे काम केले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी पक्षांची चांगली बांधणी केली. त्यांच्या कार्यकाळातच चिंचवड मतदार संघातून पहिल्यांदा कमळाच्या चिन्हावर भाजपचा आमदार निवडून आला आहे.

18 Aug 2017

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी शहरात येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण, रिंग रोड, अनधिकृत बांधकामे या प्रश्‍नावर चकार शब्द उच्चारला नाही. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीने निषेध केला आहे.

यासंदर्भात चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतक-यांच्या कर्जमाफीचे आश्‍वासन देऊन सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबईत झालेल्या मराठा मोर्चाचे गांभीर्य न ठेवता आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीचे आश्‍वासन लक्षात न ठेवता सरकारने नागरिकांना गृहीत धरले आहे. शास्ती कराचा प्रश्‍न सोडविला नाही.

मुख्यमंत्री शहरात आल्यानंतर रिंग रोडच्या प्रश्‍नावर काहीतरी मार्ग सूचवतील, अशी अपेक्षा बाधित नागरिकांना लागली होती. त्यामुळे नागरिक शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहासमोर जमा झाले होते. मात्र, निवेदन न स्वीकारता मुख्यमंत्री निघून गेल्याने हजारो नागरिकांची निराशा झाली आहे. नोटबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे.

त्यातच जीएसटी लागू झाल्यामुळे शेवटचा घटक असलेल्या सामान्य नागरिकाला भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांत वेगवेगळी आश्‍वासने देऊन भाजप सरकारने नागरिकांना भुलभुलैय्या करीत ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत नाराजीचा सूर असून सरकारच्या अशा धोरणाचा निषेध करण्यात येत आहे, असे नवले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

18 Aug 2017

केजे शिक्षणसंस्थेत 'सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनोवेशन लॅब'चे उद्घाटन

एमपीसी न्यूज - "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता ठासून भरलेली आहे. त्यांच्यातील या बुद्धिमतेला चालना दिली, तर मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे शिक्षणसंस्थांनी स्वस्त आणि दर्जेदार इनोव्हेशनसाठी पुढाकार घेतला पाहिजे. केजे शिक्षणसंस्थेने संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देत सकारात्मक पाऊल टाकले आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजनिअरिंगमध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनोवेशन लॅब'चे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी 'गुणवत्तापूर्ण शिक्षण व देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात संशोधन आणि नवनिर्मितीची आवश्यकता' या विषयावरील बीजभाषणात डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी केेजे शिक्षणसंस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वढाई, पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिवाजी पाचर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, "शिक्षण हेच उद्याचे भविष्य आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे नवनवीन संशोधन व्हायला हवे. उच्च इच्छाशक्ती, कठोर मेहनत, सहनशीलता, संधी निर्माण करण्याची क्षमता, ध्येयनिश्चिती, कुतूहलता अंगी बाळगून सातत्याने नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. आपण केलेली नवनिर्मिती स्वस्त, दर्जेदार आणि समाजाला उपयुक्त ठरेल, यावर भर दिला पाहिजे. सध्याची पिढी मायक्रोसॉफ़्ट, गुगल भारतनिर्मित असाव्यात, अशी धारणा ठेवणारी आहे. त्यामुळे या पिढीकडून अनेक चांगली इनोव्हेशन्स होतील, अशी आशा वाटते"

कल्याण जाधव म्हणाले, "होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेतर्फे शिष्यवृत्तीसह इतर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्यामध्ये सर्जनशीलता विकसित व्हावी, या हेतूने संशोधनाला चालना दिली जात आहे. बिझनेस इन्क्युबेटरद्वारे व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जात असून, कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर आहे."

डॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थी शोधून त्यांना घडविण्याचा प्रयत्न आहे. कल्याण जाधव नेहमी मोठ्या स्वरूपातील विचार करतात. 110 एकरावरील या परिसरात वेगवेगळ्या प्रयोगशाळा, प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

"समाजाला उपयुक्त असे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी येथे तयार केले आहेत. त्या प्रकल्पांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक विभागात गुणवत्ता केंद्र उभारले आहे, असे डॉ. विजय वढाई यांनी प्रास्ताविकात सांगितले. दीप्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद जाधव यांनी आभार मानले.

18 Aug 2017

पुणेकर नागरिकांचा संतप्त सवाल
एमपीसी न्यूज- गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येउन ठेपला असताना अनधिकृत जाहिरात फलकामुळे शहर विद्रुप होत चालले आहे. त्यामुळे या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे महापालिकेने जाहिरातफलकांबाबत एक धोरण तयार केले आहे. त्यानुसार जाहिरातफलक लावण्याच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. पण शहरात गेल्या काही दिवसापासून मोठयाप्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक लावले जात आहेत. त्यामुळे अधिकृतपणे होर्डिग व्यावसायिक हतबल झाले आहेत.

टिळक रस्त्यावरील पुरम चौकात लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकावर अतिरिक्त आयुक्त (विशेष) यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईला २४ तास उलटत नाही तोच हा फलक पुन्हा लागला आहे. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांना पालिका प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

18 Aug 2017

सहा सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी 899 विद्यार्थ्यांनी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज जमा केले आहेत. सहा सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत ही बक्षिसे दिली जाणार आहेत. इयत्ता दहावी अथवा बारावी परीक्षेत 80 ते 90 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार तर 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

आजवर 899 गुणवंत विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेत 80 ते 90 टक्के गुण मिळविलेल्या 502 तसेच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या 230 विद्यार्थ्यांनी अर्ज जमा केले आहेत. इयत्ता बारावी च्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या167 विद्यार्थ्यांनी बक्षीस योजने अंतर्गत अर्ज केले आहेत. अर्ज स्वीकारण्याची मुदत सहा सप्टेंबर पर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करून नागरी सुविधा केंद्राकडून पोच घ्यावी असे, आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

18 Aug 2017

एमपीसी न्यूज- आता मी नवीन फॅशनचे रेडिमेड जीन्स, टी शर्ट, पॅन्ट घालू शकतो. तसं बघायला गेलं तर ही खूप छोटीशीच इच्छा आहे. पण माझ्या वजनामुळे हे दिवस माझ्या आयुष्यात येतील असे मला कधीच वाटले नव्हते. मी ती आशाच सोडून दिली होती. मात्र डॉसच्या डॉक्टरांनी मला हे सुदिन दाखवले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे, असे प्रताप सातव मनापासून तळमळीने सांगत होते.

डायबेटिस अँड ओबेसिटी सर्जिकल सोल्युशन्स(डॉस) या पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून प्रताप सातव यांच्यावर लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रीक सर्जरी करण्यात आली. अर्थात त्याला कारणही तसेच होते. कारण सुमारे २०० किलो वजन असलेले प्रताप सातव विविध व्याधींनी ग्रस्त होते. त्यांना स्वत:चे नैमित्तिक व्यवहार करणे सुद्धा त्यांना त्रासदायक होत होते. कुठे बाहेर जायचे तर कठीण होत असे आणि व्यवसाय असल्याने बाहेर तर पडावे लागेच. कपड्यांचे माप घ्यायचे तर घरी येणा-या टेलरला दोन टेप जोडून घेऊन यावे लागे. कारण एका टेपने माप घेताच येत नसे. सगळे अगदी कटकटीचे झाले होते. अशावेळी बॅरिअॅट्रीक सर्जरी करण्यासाठी सात आठ तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला होता. पण सगळ्यांनी ही शस्त्रक्रिया करणे धोकादायक आहे, अशी भीती घातली होती. पण डॉसच्या टीमने माझी ही भीती पूर्णपणे खोटी असल्याचे मला खात्रीपूर्वक सांगितले.

मार्चमध्ये सातव यांची डॉसचे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. नीरज रायते आणि डॉ. सतीश पट्टणशेट्टी यांनी भेट घेतली. त्यांना शस्त्रक्रियेची पूर्णपणे माहिती दिली. त्यानंतर पाच सहा महिने शस्त्रक्रियेपूर्वीचे व्यायाम, खाण्यापिण्याचे पथ्य यांची माहिती दिली. योग्य ते समुपदेशन केले. आणि त्यानंतर 25 जुलै 2012 ला शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर चौथ्या दिवशी सातव यांना घरी पाठवण्यात आले.

या शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना डॉ. नीरज रायते म्हणाले की, शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी करण्याची ही आधुनिक उपचार पद्धती असून यामध्ये जठराचा आकार कमी करुन त्याला छोट्या आतड्याला जोडण्यात येते. तसेच ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात येत असल्याने कमीत कमी चिरफाड केली जाते. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात जास्त दिवस राहावे लागत नाही.

पुढील काळात प्रताप सातव यांचे वजन एका वर्षात सुमारे 75 किलोने कमी झाले. सध्या त्यांचे वजन 200 किलोवरुन 90 किलो झाले आहे. अशा रीतीने त्यांनी सुमारे 110 किलो वजन यशस्वीपणे कमी केले आहे आणि त्यामुळे ते खूप खूष आहेत. आणि मानसिक स्थिरता लाभल्याने ते सध्या त्यांच्या संपर्कात येणा-या लठ्ठ व्यक्तींचे समुपदेशन करतात आणि त्यांना डॉसच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी प्रवृत्त करतात. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या कन्येची देखील शस्त्रक्रिया करुन घेतली असून तिचे वजन 105 किलोवरुन 65 किलोपर्यंत कमी झाले आहे.

एक गमतीशीर आठवण सांगताना प्रताप म्हणाले की, माझे जुने कपडे देण्यासाठी मी गेलो असताना मला ते घेणारे कोणी सापडलेच नाही. कारण एवढे मोठ्ठे कपडे कोणाच्याच मापाचे नव्हते. पण आम्ही ते उसवून नवीन शिवू असे सांगून माझ्याकडून काहीजण घेऊन गेले.

17 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने देण्यात येणाऱ्या विविध पासेच्या किंमती मध्ये येत्या 21 तारखे पासून वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा पीएमपी प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. ही दरवाढ मागे घेण्यात  यावी अन्यथा या विरोधात भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिला आहे.

एकीकडे देशात, राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देण्यासाठी धोरण राबविण्यात येत आहे. मात्र पुण्यात मात्र या धोरणाची पायमल्ली करून ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार भाजप करत असल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे.

शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पास दर वाढीचा निर्णय घेताना ज्येष्ठ नागरिकांना पीएमपी  प्रवास दिलासादायक करण्याऐवजी उतारवयात त्यांच्यावर पाससाठी जादा दर लादून सत्ताधारी भाजपने 'बुरे दिन ' चा दाखला दिला आहे. एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करताना ज्येष्ठ नागरिकांना मात्र पीएमपीएल  प्रवासासाठी पासमध्ये आणखी सवलत देण्याऐवजी दर वाढविण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे आबा बागुल यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांवर पासदर वाढ होऊ देणार नाही वेळ पडली तर रस्त्यावर उतरून विरोध करताना भीक मागो आंदोलन केले जाईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे. यासंदर्भांत  ,मुख्यमंत्री , पालकमंत्री यांच्याकडेही दाद मागण्यात येणार असल्याची त्यांनी निवेदनात म्हटले  आहे.  

17 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशल फेडरेशनचा 37 वा स्थापना दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

निगडी, प्राधिकरण येथील मनोहर दत्तात्रय वाढोकर सभागृहात मंगळवारी (दि.15) रोजी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सोशल ग्रुप डायमंडचे पिंपरी-चिंचवड  अध्यक्ष अनुप शहा होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे शरद शहा, लालचंद जैन, सतिश बाफना, मनेष शहा, प्रवीण चोपडा, हसमुख जैन, डॉ. राजेश दोशी, अनिता शहा, सौरभ शहा आदी उपस्थित होते.

जैन सोशल ग्रुप डायमंडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अनुप शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. स्वच्छता अभियानावर प्रबोधनात्मक नाटक सादर करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी आणि मंगल पाडे यांच्या कार्याचा संदेश सभासदांनी नृत्यातून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा जैन यांनी केले. तर, पंकज गुगळे यांनी आभार मानले. सभासद स्वप्निल शेट, जय मेहता, प्रशांत गांधी, नरेश शहा, डॉलिबेन पटेल, गिता गुगळे, अतुल धोका, सिद्धार्थ शहा यांनी संयोजनात पुढाकार घेतला. 

17 Aug 2017


एमपीसी न्यूज -  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या रविवारी (दि. 20 ऑगस्ट) निषेध जागर करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत कँडलमार्च, निषेध मोर्चा, चर्चासत्र, सादरिकरण, असे विविध कार्यक्रम होणार असून सोशल मिडीयावर ‘जवाब दो’ हा हॅशटॅग चालविला जाणार आहे. अशी माहिती असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमिद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पुणे शहर कार्याध्यक्ष श्रीपाद ललवाणी आदी या वेळी उपस्थित होते. 

येत्या रविवारी (दि. २०) डॉ. दाभोलकर यांच्या खूनाला चार वर्षे पुर्ण होणार आहेत. त्यामुळे या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिसतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘जवाब दो’ या गीताने निषेध जागरची सुरुवात होणार आहे. सकळी आठ ते  दहा या वेळेत विठ्ठल रामजी पुल ते साने गुरुजी स्मारक, पर्वती या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका इमारत आणि लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा जाणार आहे.

अशोक धिवरे, विद्या बाळ, बाबा आढाव यांची या वेळी भाषणे होणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात साने गुरुजी स्मारक येथे जावेद अख्तर आणि राजदीप सरदेसाई ‘हिंसा के खिलाफ मानवता री और’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर विजय वेंâकरे, किशोर कदम, मनस्विनी लता रवींद्र आणि अरविंद जगताप ‘हिंसेला नकार मानवतेचा स्विकार ’ या विषयावर अधारित कथा, कवितांचे अभिवाचन तसेच छोट्या नाटिका सादर करणार आहेत, असे दाभोलकर यांनी सांगितले.

Page 5 of 290
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start