• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या नियुक्तीची याचिका एनजीटीने फेटाळली

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वृक्ष संर्वधन समितीवर  नियुक्त करण्यात आलेल्या स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या पात्रतेबाबतची याचिका एनजीटीने फेटाळली आहे. त्यामुळे या सदस्याच्या नियुक्तीवरील टांगती तलवार दूर झाली आहे.

राज्य सरकारच्या आदेशान्वये प्रत्येक महापालिकेला वृक्षसंवर्धन समिती नेमणे बंधनकारक आहे. नव्या पंचवार्षिकमधील पहिल्या मुख्य सभेनंतर एका महिन्याच्या आत ही समिती स्थापन करण्याचे आदेश यापूर्वी एनजीटीने दिले होते. या समितीवर नगरसेवकांपैकी किमान ५ ते कमाल १५ सदस्य नियुक्त करावे, असे महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंवर्धन व जतन कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

या समितीवर स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी म्हणून सचिन पवार, धनंजय जाधव, अरविंद गोरे, सचिन पवार, शिल्पा भोसले, मनोज पाचपुते, दत्तात्रय पोळेकर यांची सदस्यपदी नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे यामधील फक्त दोघांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यामुळे या सदस्याच्या पात्रतेबाबत काही समाजसेवी संस्थांनी एनजीटीकडे आक्षेप नोंदवला होता. त्यावर आज सुनावणी झाली. यामध्ये याबाबतची याचिका एनजीटीने फेटाळली आहे. त्यामुळे या सदस्याच्या नियुक्तीवरील टांगती तलवार दूर झाली आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn