• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : पोलीस अधिका-यांनी घेतले मानसिकतेत बदल करण्याचे धडे

एमपीसी न्यूज - पारंपारिक दबाव तंत्राचा वापर करण्यापेक्षा भावनिक दृष्ट्याही खेळीमेळीच्या वातावरणात काम करता येते असा सकारात्मक बदल पोलीस अधिका-यांच्या मानसिकतेत व्हावा. यासाठी पुण्यात भावनिक प्रज्ञा या विषयावर तीन दिवसीय शिबिर घेण्यात आले.


हे शिबिर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, विभागीय अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी दि.11 ते 13 दरम्यान सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 33 पोलीस अधिकारी, 5 पोलीस उपायुक्त, 11 सहाय्यक पोलीस आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक व 2 सहाय्यक निरीक्षक उपस्थित होते.

या शिबिरात मुंबई येथील प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घार्गे यांनी व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी समाजात उद्भभवणारा कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीत कोणत्याही प्रसगांना सहज तोंड देता यावे, कामाच्या ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण ठेवत परिस्थिती हाताळता यावी कारण याचा विपरीत परिणाम घर, मन, शरीर व कुटुंबावर होते. तो ताण कसा हाताळायचा याबाबत घार्गे यांनी मार्गदर्शन केले.

यापुढे प्रशिक्षण घेतलेल्या अधिका-यांनी आपल्या सहका-यांना प्रशिक्षण देऊन त्यांनाही सक्षम बनवावे असा या प्रशिक्षणाचा हेतू होता.

Facebook Google Plus Twitter LinkedIn