• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : पर्वती तावरे कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत पालिकेची संमती घ्या - आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - पर्वती तावरे कॉलनी येथील सर्व्हे नंबर ४७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत पालिकेच्या समंतीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाला दिले आहेत.

पर्वती तावरे कॉलनी येथील जागेवर एसआरए करण्यासाठी नागरिकांचा विरोध आहे. भूसंपदनाची कार्यवाही चालू असताना सदर जागेवर एसआरए प्रकल्प उभारण्याचा घाट विकसक आणि एसआरए अधिकारींच्या संगनमताने घातला जात आहे.

मुळात या जागेवर जुनी पक्की घरे आहेत, असे असताना दडपशाहीचा जोरावर एस आर ए प्रक्लप राबविण्याच्या प्रकारा विरोधात माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांनी वेळोवेळी हरकत घेतलेली आहे. त्यामुळे पर्वती तावरे कॉलनी येथील सर्व्हे नंबर ४७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत पालिकेच्या समंतीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी  झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाला दिले आहेत.  

Facebook Google Plus Twitter LinkedIn