• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : स्वारगेट येथील इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हबच्या जागेची आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी स्वारगेट येथील जेधे चौकात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक वाहतूक आराखड्यांतर्गत (इंटिग्रेटेड मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब) च्या जागेची पाहणी पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आज केली.

स्वारगेट येथील जेधे चौकामध्ये सुमारे चार एकर जागेमध्ये मेट्रोचे स्थानक साकारण्यात येणार आहे. त्यात एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या बसलाही सामावून घेण्यात येणार आहे. एसटी, पीएमपी आणि मेट्रो यांची सांगड घालून मेट्रो स्थानक म्हणजेच  ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्यात येणार आहे. याबाबत एसटी आणि पीएमपीबरोबर चर्चा करण्यात आली आहे.  या ट्रान्स्पोर्ट हबचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. 

येथील मेट्रोच्या स्टेशनचे काम सहा महिन्यात सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर आयुक्त कुणाल कुमार आणि पालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांनी आज जागेची पाहणी केली. त्यात विविध बाबींवर चर्चा झाली. या हबचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn