• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : पुणेकरांना पाणी कपातीचा सल्ला पाठबंधारे विभागाने देऊ नये - विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे पूर्ण भरलेली असताना देखील पाठबंधारे विभागाकडून पुणेकरांना पाणी काटकसरीचा सल्ला देणाऱ्या पाठबंधारे विभागाने कालव्यांमधून होणार ३ टीएमसीची पाणी गळती थांबवावी आणि नंतर पुणेकरांना पाणी काटकसरीचा सल्ला द्यावा, असा उलट सल्ला सजग नागिरक मंचाकडून पाठबंधारे विभागाला घेण्यात आली आहे. तसे पत्र पालकमंत्री गिरीश बापट यांना सजग नागिरक मंचाकडून देण्यात आले आहे.


पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे पूर्णपणे भरली असताना टेमघर धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने करणे शक्य नसल्याने पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला नुकताच पाठबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात पुणेकरांनी २०० कोटी खर्च करून खडकवासला ते पार्वती दरम्यान पाईपलाईन टाकून १ टीएमसी पाण्याची बचत केली आहे. तसेच १०० कोटी खर्च करून पर्वती ते कॅम्पपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

यामुळे ०. ५० टीएमसी पाण्याची कपात होणार आहे. तर मुंढवा जॅकवेलमधून ६ टीएमसी पाणी शुद्ध करून शेतीला पुरवण्यात येत आहे. असे असताना पाणी काटकसरीचा सल्ला देणारे पाठबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कालव्यांमधून जवळपास ३ टीएमसी पाणी गळती होत आहे. त्यामुळे पाठबंधारे विभागाने ती गळती रोखावी आणि नंतर पुणेकरांना सल्ला द्यावा, असा उलट सल्ला सजग नागरिक मंचाकडून देण्यात आला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn