• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pimpri: पिंपरी पालिका महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 13 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.


स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये महिलांना चार चाकी हलके वाहन (L.M.V.) चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी येणा-या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

'ब', 'क' व 'ई' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रायमरी व सेकंडरी वेस्ट कलेक्शन तसेच 'अ', 'ड' व 'फ' क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत सेकंडरी वेस्ट कलेक्शन तसेच 'अ' क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 14 व 17 मध्ये तीन टिपर वाहने प्रभाग क्रमांक 18 व 19 मध्ये दोन कॉम्पॅक्टर वाहने घरोघरचा कचरा गोळा करणे व वाहतूक करणे या कामासाठी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या 'ड' क्षेत्रीय कार्यालयातील महापालिकेचे टाटा एससीई वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहतूक करणे या कामासाठी कामगार पुरविण्यासाठी येणा-या खर्चास तसेच हे काम 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यास  मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या 'अ' आणि 'फ' क्षेत्रीय कार्यालयातील मनपाचे टाटा एससीई वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहतूक करणे या कामासाठी उपलब्ध वाहनांवर कामगार पुरविण्यासाठी येणा-या खर्चास आणि 31 ऑक्टोंबरपर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या 'ब' व 'क' क्षेत्रीय कार्यालयातील सात वार्डातील मनपाचे टाटा एससीई वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहतूक करणे या कामासाठी कामगार पुरविण्यासाठी येणा-या खर्चास आणि 'अ','ब','क','ड','इ' आणि 'फ' क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व गटर्स साफसफाई करण्यासाठी येणा-या सुमारे तीन कोटी 43 लाख 88 हजार रुपयांच्या खर्चास आणि हे काम 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Facebook Google Plus Twitter LinkedIn