• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pimpri : स्वाईन फ्लूने घेतला चार वर्षांच्या चिमुरडीचा बळी; मृतांचा आकडा 44 वर

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लूमुळे दिघी येथील चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 332 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 283 रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

दिघी येथील चार वर्षीय मुलीला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून 29 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने रुग्णाला 31 ऑगस्ट रोजी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना तिचा त्याच दिवशी मृत्यू झाला.

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईनफ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात. अजूनही 26 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Facebook Google Plus Twitter LinkedIn