• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pimpri : बीआरटीएस व मेट्रोबद्दल माहिती व सूचना देण्यासाठी महापौरांनी नगरसेवकांची बैठक बोलवावी - बाबू नायर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड  शहरातील मेट्रो व बीआरटीएस या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाची संपूर्ण  माहिती मिळावी, त्यावर सूचना  देता याव्यात  यासाठी महापौर नितीन काळजे यांनी सर्व नगरसेवकांची एक बैठक बोलवावी, अशी मागणी नगरसेवक बाबू नायर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात नायर यांनी म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवडच्या विकासात भर टाकणारे व महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणा-या मेट्रो व बीआरटीएस प्रकल्पांची नगरसेवकांनी इत्यंभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण शहरातील वाहतूक व्यवस्था विकसीत व सुरळीत कऱण्यासाठी या दोन्ही प्रकल्पांचा मोठा हातभार असणार आहे.

यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा अॅटोक्लस्टरमध्ये  नगरसेवकांची एक बैठक बोलावून मेट्रो व बीआरटीएस प्रशासनाद्वारे दोन्ही  प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात यावे जेणेकरुन नगरसेवकांना त्यांच्या शंका व सूचना मांडता येतील.

महापालिकेच्या सभेमध्ये  मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले मात्र तेथे नगरसेवकांना शंका मांडता आल्या नाहीत. शिवाय मेट्रोबाबत  सखोल माहिती मिळाली नाही. बीआरटीएसची सद्यस्थिती काय आहे, प्रकल्प कसा राबवाला जात आहे याची माहिती नगरसेवकांना मिळावी यासाठी लवकरात लवकर  महापौरांनी बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 
Facebook Google Plus Twitter LinkedIn