• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

पुणेकरांचे पालखी दर्शन तर वारकऱ्यांचे पुणे दर्शन


एमपीसी न्यूज - नानापेठमधील निवडुंग विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांची आणि भवानी पेठेत पालखी विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या विसावल्या असून पुण्यात दोन रात्र एक दिवसात मुक्काम असल्याने वारकरी काहीसे निवांतपणा आल्याने वारकऱ्यांनी पुणे दर्शनाचा बेत आखला आहे. शहरातील लाल महाल, सारसबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणांना वारकरी भेट देत आहेत.


तर पुणेकर नागरिक माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या विसाव्याच्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. विसाव्यासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या जेवण खाण्याची जबाबदारी मात्र भवानी पेठेतील रहिवासी मोठ्या आनंदाने उचलताना दिसत आहेत. वारीच्या काळात सारी कामे बाजूला ठेवून वारकऱ्यांच्या सेवेत हा सारा परिसर तल्लीन झाला आहे. सार्वजनिक मंडळांसह घराघरातही जेवणाच्या पंगती सुरू आहेत. या भागातल्या प्रत्येक लहान मोठ्या घरात हे अन्नदान सुरू होते. केवळ घरांमध्येच नाही तर विविध गोडाऊनच्या बाहेरही अशा पंक्ती उठवल्या जात आहेत.

वारकऱ्यांसाठी खास पिठलं-भाकरीचा बेत

दिवसरात्र चालून आणि बाहेरच खाऊन कंटाळलेल्या वारकऱ्यांसाठी या भागात खास पिठलं भाकरीचा बेत केला जातो. या सोबत वरण-भात, ठेचा, वांग्याची भाजी असेही पदार्थ केले जातात. वर्षभराने येणाऱ्या या लाडक्या पाहुण्यांसाठी जिलेबी, लापशी, शिरा असे गोड पदार्थ जेवणात ठेवले जातात.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start