• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी


एमपीसी न्यूज - राष्ट्रपतीपदासाठी भाजप प्रणित एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवारी) केली. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. 23 जूनला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलै रोजी मतदान आणि 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच एनडीए आणि यूपीएकडून उमेदवार कोण असतील यावर चर्चा सुरू होती.

शिवसेनेला नाव कळवले असून नाव कळवल्यानंतर शिवसेना भूमिका जाहीर करणार असल्याचे, शहा यांनी स्पष्ट केले. दलित समाजातून येणारे रामनाथ कोविंद यांनी मागासवर्गीयांसाठी नेहमीच संघर्ष केला असल्याचे शहा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. सोनिया गांधी चर्चा करून अंतिम निर्णय कळवतील, असे शहा यांनी म्हटले आहे.

कोण आहेत रामनाथ कोविंद

>> 1 ऑक्टोबर 1945 ला उत्तरप्रदेश, कानपूरमधील छोट्या गावात दलित कुटुंबात जन्म

>> भाजपमधील विविध पदांवर काम. पेशाने वकील.

>> 1998 ते 2002 या काळात भाजप दलित मोर्चाचे अध्यक्षपद सांभाळले.

>> अखिल भारतीय कोळी समाजाचेही अध्यक्षपदही भूषविले आहे.

>> भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

>> 1994 ते 2000 आणि 2000 ते 2006 अशी 12 वर्ष राज्यसभेचे सदस्य

>> 8 ऑगस्ट 2015 रोजी राष्ट्रपतींनी बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start