• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

वाट चुकलेल्या 32 वारक-यांना दाखवला मार्ग

 

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची वारक-यांना मोलाची मदत

एमपीसी न्यूज- पालखीच्या गर्दीत शहर परिसरात वाट चुकलेल्या सुमारे 32 वारक-यांना वाट दाखवणे किंवा त्यांच्या दिंडीमध्ये त्यांना परत आणून सोडण्याचे काम प्राधिकरण कृती समितीतर्फे करण्यात आले. त्यांच्या उपक्रमामुळे वारक-यांनाही मोलाची मदत झाली.

वाट चुकलेल्या 32 वारकऱ्यांना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या कुलदीप डांगे, संजय प्रधान, बळीराम शेवते, विजय जगताप, शिवाजी अडसूळ, मयुरेश महाजन, नाना कुंबरे, प्रदीप पिलाने, मंगेश घाग, राम सर्वे, राजकुमार कांबीकर, संदीप सकपाळ, साक्षी कदम, मौसमी घाळी, विद्या शिंदे, दादा आढाव, रमेश शिंदे, तुकाराम दहे, रवी भावके, प्रशांत रणसिंग, शब्बीर जामदार, अमोल कानु, अमित डांगे, बाबासाहेब घाळी, अमृत महाजनी, प्रज्वल ख्याडगी, जयप्रकाश शिंदे, जयेंद्र मकवाना, अर्चना घाळी, शीतल धामापुरकर, प्रवीण इथापे पाटील, अभिजीत जोशी, विजय मुनोत, आशिष गांधी आणि समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी त्यांच्या दिंडीत पुन्हा पोहोचविले.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या 120 पोलीस मित्र स्वयंसेवकांनी देहू ते आकुर्डी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सुरक्षा बंदोबस्त केला. तसेच वारकऱ्यांना मदत दिली. देहू मुख्य मंदिर-देऊळ वाडा- इनामदार वाडा - अनगडबाबा शहादर्गा दरम्यान होमगार्ड, पोलीस व स्वयंसेवक पोलीस मित्र यांच्या समवेत सुरक्षा साखळी करून मुख्य पालखीचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा केंद्रापर्यंत वारकऱ्यांना पोहोचविणे. शौचालय व स्वच्छतेबाबत प्रबोधन, शुद्ध पेयजल देणे, नदीघाटाची माहिती देणे, दर्शनबारीची माहिती भाविकांना देणे अशा पद्धतीची कामे समिती पोलीस मित्र स्वयंसेवकांनी केली.

त्यांच्या या कामाचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे (परीमंडळ 3), अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक) राजेंद्र भामरे, देहूरोड उपविभागीय अधिकारी गणपत माडगुळकर यांनी विशेष कौतुक केले. तर या उपक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक शंकर औताडे, दुर्योधन पवार, अरुण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सविता भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start