• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

पीएमआरडीएच्या विकास आराखडा निर्माण प्रक्रियेला सुरुवात - बापट

वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार, पीएमआरडीएचे क्षेत्रफळ 7356.51चौरस कि.मी

एमपीसी न्यूज - गेली अनेक वर्षे रखडलेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या विकास आराखड्याच्या निर्माण प्रक्रियेला सुरुवात झाली असून आगामी वर्षभरात तो पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

पीएमआरडीएचे एकूण क्षेत्रफळ 7356.51 चौरस कि.मी आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिका, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, राजगुरूनगर, चाकण, शिरूर आणि सासवड या सात नगरपरिषदा, पुणे शहर मावळ, मुळशी, हवेली हे संपुर्ण तालुके आणि खेड, शिरूर, पुरंदर, दौंड, वेल्हे, भोर याभागातील क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. 

पीएमआरडीएने जाहीर केलेल्या विकास आराखड्यामध्ये त्या त्या क्षेत्रातील सिमारेषा जाहीर केल्या जातील. त्यानंतर त्यासंबंधी नागरिकांच्या काही हरकती असतील तर त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असेल. या कालावधी हरकती आल्या तर त्यासुध्दा दोन महिन्याच्या आत निकाली काढल्या जातील असे बापट यांनी सांगितले. पीएमआरडीएत समाविष्ट असलेले क्षेत्र दर्शवणारा नकाशा प्राधिकरण कार्यालयात कामकाजांच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे.

जमीन वापर नकाशासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर

पीएमआरडीएच्या विकास योजना तयार करण्यासाठी जमीन वापर नकाशा (Existing Land Use Map) तयार करण्याच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली असून 31 जुलैपर्यंत हा नकाशा पूर्ण होईल. यासाठी उच्च तंत्रज्ञानचा वापर करण्यात आला असून यामध्ये 10 से.मी.रिझोल्युशनपर्यंत अचुकता असलेले हवाई चित्रण करण्यात आले आहे. यासाठी प्राधिकरणाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे वर्षभरात पीएमआरडीएच्या विकास आराखडा पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start