• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला मिळाले 'बोधचिन्ह'

बोधचिन्ह स्पर्धेत देबाज्योती दास प्रथम

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटीला आता 'बोधचिन्ह' मिळाले आहे. महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या बोधचिन्ह स्पर्धेत देबाज्योती दास यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानातून आपला सहभाग काढून घेतल्यामुळे तिस-या टप्प्यात पिंपरी - चिंचवड महापालिकेचा समावेश झाला आहे. त्यानुसार विशेष उद्देश वहन (स्पेशल पर्पज व्हेईकल अर्थात (एसपीव्ही) स्थापन करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या सर्व शहरांनी त्यांच्या एसपीव्हीसाठी वैशिष्ट्यपूर्ण बोधचिन्ह तयार करून अभियानाची वेगळी व आकर्षक ओळख करण्याचा प्रयत्न केला आहे. 

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीनेही बोधचिन्ह तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. या कामी महापालिकेतर्फे 23 फेब्रुवारी ते 15 मार्च 2017 या कालावधीत बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी, चित्रकार, जाहिरात एजन्सी सहभागी झाल्या. बोधचिन्हात कोणताही फोटो, आयकॉन, सिंबॉल, इमेज याचा वापर न करता 4 बाय 4 चौरस इंचामध्ये ते सादर करावयाचे होते. जास्तीत-जास्त शंभर शब्दांद्वारे तयार करण्यात आलेला हा लोगो स्बुदन् वेबसाईटवरच सादर करावयाचा होता. 

या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 108 प्रवेशिका सादर झाल्या. स्पर्धेचे परिक्षण तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील अधिका-यांच्या समितीने केले. त्यात मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर, सहशहर अभियंता प्रविण तुपे, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांचा सदस्य म्हणून समावेश होता. 

या समितीने सर्व प्रवेशिकांचे परिक्षण करून तीन बोधचिन्ह निवडली आहेत. स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे पंचवीस हजार, वीस हजार आणि पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत देबाज्योती दास यांनी प्रथम क्रमांक, केतन कृष्णकांत तुळसुळकर यांनी द्वितीय तर अनिकेत सुवर्णा यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start