• advt_12501.jpg
 • ban123.jpg
 • Dinesh-Yadav1.jpg
 • Gopal-Malekar2.jpg
 • Khedekar-1250-X-200-For-Web.jpg
 • Kunal-Landge-Advt23.jpg
 • map-ban.jpg
 • newbanner.jpg
 • Rajabhau-sawant4.jpg
 • Sandip-Nakhate5.jpg
 • Vinod-tapkir6.jpg
 • Vitthal-Bhoir7.jpg
16 May 2018

Pimpri: चार वर्षाच्या कारकिर्दीत जनतेचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी - खासदार बारणे
एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीला चार वर्ष पूर्ण झाले असून गेल्या चार वर्षात आपण विकासकामांबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो. तसेच, महापालिकेचा नगरसेवक ते देशातील सर्वोच्च असलेल्या लोकसभेचा सदस्य या राजकीय प्रवासात कामांबरोबर अनेक अनुभव मिळाल्याचे सांगत खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या कारकीर्दीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाला आज (16 मे) रोजी चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने खासदार बारणे कारकीर्दीचा लेखाजोखा प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून मांडला. त्यांनी म्हटले आहे की, लोकसभेचे सदस्य झाल्यापासून संसदेमध्ये आत्तापर्यंत 935 तारांकित व अतारांकित प्रश्न मांडले. तसेच 255 वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेतला. तर 16 महत्वाच्या विषयांवर खासगी विधेयके मांडली. त्यांची लोकसभेतील एकूण उपस्थिती 94 टक्के राहिली असून या अर्थ संकल्पीय अधिवेशनात 100 टक्के उपस्थिती राहिली आहे. उत्कृष्ट संदसीय कारकीर्दीसाठी प्राईम पॉईंट फाउंडेशन चेन्नईच्या वतीने सलग तीन वेळा 'संसद रत्न पुरस्कार' मिळाला.

पिंपरी व पनवेल येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले. उरण येथील घारापुरी एलिफंटा लेणीचा देशाच्या पर्यटन विकास क्षेत्रात समावेश केला. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी कर्जत तालुक्यातील तुंगी, डोंगरपाडा या अतिशय दुर्गम आदिवासी भागात वीजपुरवठा पोहचविला. पुणे लोणावळा तिस-या व चौथ्या नवीन रेल्वे ट्रँकसाठी पाठपुरावा, पनवेल ते उरण जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करण्यास मंजुरी मिळवून कामाला सुरुवात केली. तळेगाव ते चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग क्र. ५५ यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेतली.

पिपंरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणाती गाळ सातत्याने तीन वर्ष काढून पाण्याचा साठा वाढविला. कल्याण–मुरबाड–कर्जत-भीमाशंकर या नवीन मार्गास केंद्र सरकारकडून मंजुरी घेतली. पिंपरीतील हिंदुस्तान एन्टीबायोटिक्स (एचए) कंपनी पुनर्निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपये मंजूर करून घेतले. माथेरानची बंद असलेली ऐतिहासिक मिनी ट्रेन पुन्हा चालू केली. तेथील मार्गाची दुरुस्ती व नवीन इंजिन घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी तरतूद केली. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्यात यश आले असून लवकरच त्यांच्या नावाचे तिकीट प्रकाशित होणार आहे. शहरातील नागरिकांच्या अनधिकृत बांधकाम व शास्तिकराच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला.

मावळातील औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेले मावळातील 732 हेक्टर क्षेत्र वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय बारणे यांच्या प्रयत्नामुळे झाला. त्याबरोबर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीचे मुद्दे लोकसभेत उपस्थित केले. तर, कार्ला, भाजे, एलिफंटा लेणी तसेच रायगड, विसापूर, लोहगड, राजमाची, तुंग, तिकोना या किल्यांच्या संवर्धन व पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संरक्षण खात्याशी निगडीत शहरातील रेडझोन, मावळातील मिसाईल प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

Tagged under

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares