16 Apr 2018

Pimpri : नालेसफाई करण्यासाठी एप्रिल अखेरची डेडलाईन!
पालिका सीएसआर, लोकसहभागातून नालेसफाई करणार 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने यंदा मार्च महिन्यापासून नालेसाफ सफाईचे मोहिम हाती घेतली आहे. त्याचे काम देखील युद्ध स्तरावर सुरु आहे. या कामासाठी निविदा काढली जाणार नाही. सीएसआर फंडातून आणि  लोकसहभागातून नालेसफाई केली जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) दिली. तसेच नालेसफाई करण्यासाठी  एप्रिलअखेरची डेडलाईन देण्यात आली असल्याचेही, त्यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे-मोठे मिळून 192 नाले आहेत. नाल्यांची लांबी 99088.84 असून 100 किलोमीटर आहेत. पालिकेच्यावतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते. उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसाफई केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पावसाळ्यापुर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. दरवर्षी मे महिन्यात साफसाफई केली जाते. परंतु, यंदा मार्च महिन्यापासूनच नाल्यांची साफसाफई मोहिम हाती घेतली आहे. 

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''नालेसफाई महिन्याभरापासून सुरु झाली असून त्याचे काम वेगात सुरु आहे. प्रत्येक फ्रभागात त्याचे काम सुरु आहे.  नालेसफाईसाठी  निविदा काढली जाणार नाही. सीएसआर फंडातून आणि  लोकसहभागातून नालेसफाई केली जात आहे. जिथे निविदा काढण्याची आवश्यक असेल तिथे स्थापत्याच्या खर्चातून नाल्यांची सफाई केली जाणार आहे. नाल्यात बेकादेशीरपणे सांडपाणी कोठून सोडले जाते, त्याची शोध मोहिम हाती घेतली आहे. जास्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर आमचा भर राहणार आहे. पालिका 230 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करत होती. आता त्यामध्ये वाढ झाली असून 250 ते 255 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. अडचणीच्या नाल्यांसाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहोत. एप्रिलअखेरपर्यंत नाले सफाई पुर्ण केली जाणार आहे''.

Tagged under

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares