• advt_12501.jpg
  • ban123.jpg
  • Khedekar-1250-X-200-For-Web.jpg
  • map-ban.jpg
16 Apr 2018

Pune : ही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी - अॅड. प्रकाश आंबेडकर
एमपीसी न्यूज - 'संविधान बदलले पाहिजे' या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे नरेंद्र मोदी यांनी कधीही खंडन केले नाही. राष्ट्रीय सवसेवक संघाने 1949 साली केलेल्या ठरावानुसार ते अद्यापही संविधान मानत नाहीत. आणि नरेंद्र मोदी त्या संघटनेतून वर आले आहेत. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणे म्हणजे ही नरेंद्र मोदींची नौटंकी असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथे 'आयुष्यमान भारत' या आरोग्य योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो, असे वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर खरचं प्रेम वाटले असते,  तर जुन्या काळामध्ये ओबीसींना मिळणारी स्कॉलरशीप त्यांनी बंद केली नसती. दुर्दैवाने ओबीसीचा पंतप्रधान झाला आणि ओबिसींची स्कॉलरशीप गेली, अशी परिस्थीती असल्याचे ते म्हणाले.

Media

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares