• mahesh_kale_1250by200.jpg
13 Jan 2018

Pimpri : स्वामी विवेकानंद क्रीडामहोत्सव 2018 ला उत्स्फूर्त प्रतिसाद
एमपीसी न्यूज - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी-चिंचवड महानगरतर्फे व डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ यांच्या सहआयोजनाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद क्रीडामहोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉक्स क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील एकूण 37 महाविद्यालयांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  
 
स्वामी विवेकानंद क्रीडामहोत्सव 2018  दि. 4 ते 11 जानेवारी दरम्यान पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मैदानावर पार पडला. या क्रीडामहोत्सवात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील एकूण 37 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यावेळी अभविपचे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री देवदत्त जोशी, कबड्डी लीगचे पिंक पँथर जयपूर संघाचे खेळाडू सुनील सिद्धगवळी, पिंपरी-चिंचवड महानगरमंत्री आदित्य पवार,  क्रीडा महोत्सव प्रमुख दीप प्रकाश, अभाविप प्रदेश अध्यक्ष डॉ प्रशांत साठे, संयुक्त पुणे जिल्हा संयोजक चैतन्य पंडित तसेच पिंपरी चिंचवड संघटन मंत्री निकिता घयतड़के ,सुजय भोसले, प्रतीक कस्तुरे, सुहास रासकर, वैभव थोरात, निलम सांभेरा, नेहा चव्हाण, हर्शदा क्षीरसागर, आरती गिरी, तेजस चवरे, अनिकेत वैद्य, गौरव वाळुंजकर, प्रभंजन धनु, आशीष देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या सिनेट अधिसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार संतोष ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. 
 
या क्रीडामहोत्सवात बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटातून अथर्व चौरी (राजश्री शाहू इंजिनिअरिंग महाविद्यालय, ताथवडे) याने विजेतेपद मिळवले तर मुलींमध्ये तपस्या लांडगे (एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय) हिने बाजी मारली. 
 
कब्बडी स्पर्धेत मुलांच्या गटात औंधच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला तर मुलींच्या संघात राजमाता जिजाऊ संघांने बाजी मारली. मुलींच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये डी.वाय.पाटील फार्मसी महाविद्यालय विरुद्ध नॉवेल इंटरनॅशनल गर्ल्स स्कूल सामन्यात नॉवेल इंटरनॅशनल गर्ल्स संघाची कर्णधार आरती बेहेनवाल हिने नाबाद 105 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.  मुलांच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी संघाने विजेतेपद पटकावले.  
 
मुलांमध्ये सामनावीर म्हणून डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा नवज्योत गुरव तर मुलींमध्ये नॉवेल इंटरनॅशनल गर्ल्स स्कूल संघाची कर्णधार आरती बेहेनवाल ही सामनावीर ठरली. सर्वोत्कृष्ट गोलदांजाचा मान  डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेदिक कॉलेज पिंपरीच्या सुजय भोसले याने तर मुलीमंध्ये सर्वोत्कृष्ठ गोलंदाज म्हणून प्राजक्ता तांभालेने मान मिळवला. तर मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून .संघवी केसरी मजविद्यालय ऑफ एसीएसचा अभिजीत पाटोळे तर मुलींमध्ये प्रिया धेरंगे ही सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरली. 
 
यावेळी बोलताना देवदत्त जोशी म्हणाले की, या सपर्धेत सुमारे 37 महाविद्यालातील 637 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हरणे आणि जिंकणे यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे, त्याचा अनुभव घेणे महत्वाचे असते. ज्यामुळे मुलांमध्ये सामाजिक भावना आणि खिलाडूवृत्ती निर्माण होते. समृद्ध भारतासाठी अशी तरुण पिढी तयार करणे हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम आहे.  पिंपरी-चिंचवड महानगरचे तरुण हे काम करतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares