• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स , बॅनर्स लावणा-यांवर खटले दाखल करा - महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात अनधिकृतपणे फ्लेक्स, पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्यां विरोधात खटले दाखल करावेत आणि आकाशचिन्ह परवाना विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करून सर्व फ्लेक्स, पोस्टर्स आणि बॅनर्स त्वरित कढून टाकण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आज (शुक्रवार) प्रशासनाला दिले.


महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आज स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेबाबत बैठक पार पडली. यामध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली घनकचरा व्यवस्थापन प्रमुख आणि आकाश चिन्ह विभाग प्रमुख उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये शहरातील रस्त्यावरील आणि रस्त्यालगत पडलेला राडारोडा त्वरित उचलण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील पथारी व्यावसायिकांकडून कचरा करण्यात येत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पान  टपरीवाल्यांना कचरा डबा सक्तीचा करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरात रस्त्यावर बेवारस पडलेल्या गाड्या उचलून त्या उपलब्ध करून दिलेल्या जागेत डम्प करण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला. 

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares