• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : पब्लिक बायसिकल शेअरिंगच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

एमपीसी न्यूज -  पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने (PSCDCL) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहका-याने राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या दुस-या टप्प्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि ओफो कंपनीचे प्रांतीय व्यवस्थापक दीपक सारडा उपस्थित होते.

“विद्यापीठ स्तरावर शिकणारे विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक आहेत. पुणे स्मार्ट सिटीच्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपण येथील ऑक्सिजन आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षित करण्यास हातभार लावत आहात, याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! शहराच्या इतर भागांतही सायकल शेअरिंगला पुणेकरांकडून असाच प्रतिसाद मळेल,” अशी आशा व्यक्त करत महापौर मुक्ता टिळक यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता आम्ही ओफो कंपनीच्या पिवळ्या रंगातील अत्याधुनिक सायकली प्रायोगिक तत्त्वावर ठराविक कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी शक्य तितका वाढविण्याची विनंती आम्ही ओफो कंपनीला करणार आहोत.” विद्यार्थ्यांसाठी हे विशेष प्रयत्न केल्याचे सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात जगताप यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत त्यांना इतरांनी आपल्या स्मार्टफोन ऍप्लिकेशनवरून ही सायकल सेवा वापरण्यासाठी सहकार्य करावे. यामुळे ‘शेअरिंग’चा आनंद आणखी वाढेल. पुणे स्मार्ट सिटीने विद्यापीठाला प्रथम शंभर आणि आता 275 सायकली देऊन या योजनेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.”

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “हवामानात होणाऱ्या बदलांमुळे होणारी हानी रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे सायकलसारख्या इंधनविरहित वाहनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रदूषणास आळा घालण्यासाठी आरोग्यदायी वाहतुकीस प्रोत्साहन देणारा हा स्मार्ट सिटीचा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

IMG 5464

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares